भारतात कोण कोणाचे इंटरनेट वापरते? देशात ८६ कोटी १४ लाख इंटरनेट वापरकर्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:28 PM2024-04-15T12:28:36+5:302024-04-15T12:33:09+5:30

Internet Users In India 2024: देशात सर्वाधिक इंटरनेट कोणत्या कंपनीचे वापरले जाते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात कोणीच इंटरनेटपासून दूर नाही. प्रत्येकाचा कोणत्या ना कारणामुळे इंटरनेटशी संबंध आहे.

भारतात तब्बल ८६ कोटी १४ लाख इंटरनेट वापरकर्ते आहेत.

भारतातील सर्वाधिक मोठा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कोण? देशात सर्वाधिक इंटरनेट कोणत्या कंपनीचे वापरले जाते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

एक काळ होता, ज्यावेळी एअरटेलनं या क्षेत्रावर अक्षरश: अधिराज्य गाजवलं. पण आता ते दुसऱ्या स्थानावर ढकलले गेले आहेत आणि त्यांची जागा अंबानींच्या जीओनं घेतली आहे.

केवळ आठ वर्षांपूर्वी या क्षेत्रात उतरलेल्या जिओनं अनेकांना अक्षरश: खाऊन टाकलं. या क्षेत्रातील त्यांचा आजचा बाजारहिस्सा आहे जवळपास ५२ टक्के.

जिओच्या आगमनानंतर काही दिवसांतच २०१६ नंतर व्हिडीओकॉन, एमटीएस इंडिया, एअरसेल, टेलेनॉर, टाटा डोकोमो. यांना शब्दश: गाशा गुंडाळावा लागला.

दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानींच्या जिओचा इंटरनेट क्षेत्रात दबदबा आहे. देशातील ५१.९८ टक्के इंटरनेट वापरकर्ते जिओचे ग्राहक आहेत.

या यादीत सुनील मित्तल यांची एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात २८.७९% एअरटेलचे वापरकर्ते आहेत.

तसेच एसीटी ०.२५%, बीएसएनएल २.८५% आणि वीचे १४.५% वापरकर्ते आहेत. तर १.६३% वापरकर्ते इतर कंपन्यांचे ग्राहक आहेत.

संदर्भ - ट्राय आणि फिनशॉट्स