फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 22:02 IST2025-08-26T21:56:27+5:302025-08-26T22:02:56+5:30

तुमचाही इंटरनेट डेटा लवकर संपत असेल, तर या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचा डेटा वाचवू शकता.

आजकाल प्रत्येक काम इंटरनेटशिवाय अपूर्ण आहे. फोनमधील ॲप्स, टीव्हीवरील वेब सिरीज किंवा युट्यूबवरील गाणी ऐकण्यासाठी इंटरनेटची गरज असते. पण, प्रत्येकाच्या घरी वाय-फाय असेलच असे नाही, त्यामुळे अनेकजण मोबाईल डेटावर अवलंबून असतात. तुमचाही डेटा लवकर संपत असेल, तर या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचा डेटा वाचवू शकता.

अनेक ॲप्स वापरत नसतानाही बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात आणि इंटरनेट वापरतात. हे थांबवण्यासाठी, फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन 'Background Data Usage' हा पर्याय बंद करा. यामुळे अनावश्यक ॲप्सवर डेटा खर्च होणार नाही.

गुगल प्ले स्टोर किंवा ॲप स्टोरमध्ये ऑटो-अपडेटचा पर्याय चालू असतो. त्यामुळे नवीन अपडेट आल्यावर फोन आपोआप तो डाउनलोड करतो. हे थांबवण्यासाठी, प्ले स्टोरच्या सेटिंग्समध्ये जा आणि 'ॲप्स ऑटो-अपडेट'चा पर्याय 'Over Wi-Fi only' असा सेट करा.

व्हिडीओ पाहणे हा डेटा वापरण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. जर तुम्ही युट्यूब, इन्स्टाग्राम किंवा इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर हाय-क्वालिटी व्हिडीओ पाहत असाल, तर डेटा खूप लवकर संपतो. त्याऐवजी, तुम्ही 480p किंवा 720p पर्याय निवडा. यामुळे व्हिडीओची स्पष्टता चांगली राहील आणि डेटाही वाचेल.

क्रोम किंवा इतर ब्राउझरमध्ये 'लाइट मोड' किंवा 'डेटा सेव्हर' नावाचे फीचर असते. हे फीचर चालू केल्यावर ब्राउझर पेजला कॉम्प्रेस करून उघडतो, ज्यामुळे कमी डेटा वापरला जातो.

अनेक ॲप्स सतत नोटिफिकेशन्स पाठवतात आणि त्यासाठी डेटा वापरतात. तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला नको असलेल्या ॲप्सच्या नोटिफिकेशन्स बंद करू शकता. यामुळे डेटासोबतच तुमच्या फोनची बॅटरीही जास्त काळ टिकेल.

युट्यूब आणि स्पॉटिफायसारखे ॲप्स व्हिडीओ आणि गाणी डाउनलोड करून ऑफलाइन पाहण्याचा किंवा ऐकण्याचा पर्याय देतात. वाय-फाय कनेक्शन असताना हे व्हिडीओ आणि गाणी डाउनलोड करा आणि तुमचा मोबाईल डेटा वाचवा.