Google Meet ची सर्व्हिस आता मोफत, असं करा रजिस्टर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 10:16 PM2020-04-30T22:16:14+5:302020-04-30T22:37:44+5:30

जगभरात झूम अॅपची वाढती लोकप्रियता पाहून Google ने सुद्धा आपले प्रीमियम व्हिडीओ कॉन्फरंसिंग प्लॅटफॉर्म Google Meet सर्वांसाठी मोफत केले आहे. तुम्ही सुद्धा यासाठी मोफत अकाऊंट तयार करू शकता आणि याची सुरुवात मे महिन्यापासून होणार आहे.

Googleच्या या व्हिडीओ कॉलिंग सर्व्हिसचा वापर करण्यासाठी सब्सक्रिप्शन चार्ज द्यावा लागत होता. Googleने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, Google Meet जगभरातील युजर्ससाठी मोफत करण्यात येणार आहे.

दरम्यान, Google Meet अॅप वापरण्यासाठी आतापर्यंत गुगल बिझनेस किंवा एज्युकेशन अकाऊंटची आवश्यकता होती. मात्र, आता यासाठी सामान्य युजर्स आपल्या कोणत्याही जीमेल आयडीने साइन अप करु शकतात. तसेच, हे अॅप वेब, अॅन्ड्राईड आणि आयफोनवर मोफत वापरता येणार आहे.

Google Meet ची खासियत म्हणजे यामाध्यमातून एका व्हिडीओ कॉलमध्ये १०० लोक सामील होऊ शकतात. कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन दरम्यान अनेक लोक वर्क फॉर्म होम करत असल्यामुळे जास्तकरून व्हिडीओ कॉलिंगचा वापर करत आहे.

Google ने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, मे महिन्याच्या सुरुवातील ई-मेलच्या माध्यमातून Google Meet वर साइन इन केले जाऊ शकते. यामध्ये जास्तकरून बिझनेस आणि एज्युकेशनसाठी मिळतात, तेच फीचर्स मिळणार आहे. तसेच, यामध्ये सिम्पल शेड्युलिंग, रिअल टाईम कॅप्शन्स, स्क्रीन शेअरिंग आणि लेआऊट फीचर्सचा समावेश आहे.

कंपनीने एक Notify Meचा ऑप्शन जारी केला आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक माहिती याठिकाणी दिली आहे. तसेच, ही माहिती उपलब्ध झाल्यास आपल्याला नोटिफिकेशन देऊन सांगितले जाईल.

विशेष म्हणजे, Google Meet यापुढे आता मोफत होणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, Google Meet प्रॉडक्ट डायरेक्टर स्मिता हाशिम यांनी सांगितले की, हे अॅप जीमेल सारखेच यापुढे सुरु राहील. व्हिडीओ कॉन्फरंसिंग आता असेंशियल सर्व्हिस झाले आहे.