Coronavirus : Apple Maps देणार आता कोरोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:04 PM2020-04-19T14:04:44+5:302020-04-19T14:15:24+5:30

Coronavirus : देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत. यातच आता अॅपल मॅप्सनेही पुढाकार घेतला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 160,784 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,332,471 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 600,006 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत.

देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत. यातच आता अ‍ॅपल मॅप्सनेही पुढाकार घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच गुगलने कोरोना ट्रॅकर वेबसाईट लाँच केली आहे. लवकरच आता अ‍ॅपल मॅप्सवर कोरोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती मिळणार आहे.

अ‍ॅपल मॅप्स अ‍ॅपमध्ये लवकरच कोरोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती अपडेट करण्यात येणार असल्याचं अ‍ॅपलने नुकतच सांगितलं आहे. अ‍ॅपलने यासाठी एक पोर्टल लाँच केले आहे. 

मॅप्सचे एक अपडेट जारी करण्यात येईल. त्यानंतर अ‍ॅपल मॅप्समध्ये कोरोना व्हायरसच्या चाचणी केंद्राची माहिती देण्यात येणार आहे. 

आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था आणि रुग्णालयासाठी हे तयार करण्यात आले आहे. अ‍ॅपलच्या पोर्टलवर रुग्णालय आणि आरोग्य संस्था कोरोना व्हायरस चाचणीसाठी नोंदणी करू शकतील. 

अ‍ॅपल मॅप्ससाठी काम करीत असलेली टीम याचा तपासणी करतील. त्यानंतर चाचणी केंद्राची अ‍ॅपल मॅप्स अ‍ॅपमध्ये अपडेट करण्यात येईल.

9टू5मॅकच्या एका रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल मॅप्समध्ये कोरोना चाचणी केंद्राच्या नावाशिवाय मोबाईल नंबर आणि आरोग्य संस्थांसोबत रुग्णालयाची माहिती मिळेल. 

चाचणी लॅब विषयी पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. या ठिकाणी कशी चाचणी होईल, याची माहिती दिली जाईल. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, हेही यामध्ये कळणार आहे.