व्हा सावध! तुमच्या बंद केलेल्या फोन क्रमांकाचा वापर तुमचे पैसे चोरण्यासाठीही केला जाऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 12:03 PM2021-05-06T12:03:34+5:302021-05-06T12:12:32+5:30

Old mobile number : जुन्या फोन क्रमांकाचा वापर करून चोरली जाऊ शकते तुमची वैयक्तिक माहिती, पाहा संशोधनातून कोणती माहिती आली समोर.

जसजसं तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे तसतसे फ्रॉड आणि स्कॅमही तेजीनं वाढत आहेत. सध्या एक नवा स्कॅम समोर आला आहे जो मोबाईल क्रमांशी निगडीत आहे.

जेव्हा तुम्ही नवा मोबाईल क्रमांक घेता तेव्हा तुमच्या जुन्या मोबाईल क्रमांकाचं काय होतं याचा विचारही कधी केला नसेल.

अनेकदा कंपन्या तुमच्या जुन्या नंबरला रिसायकल करतात आणि नव्या युझरला असाईन करून टाकतात.

अनेकदा टेलिकॉम कंपन्या सीरिज नंबर वाढू नये यासाठी या पर्यायांचा वापर करत असतात. परंतु ही प्रोसेस त्या युझर्ससाठी चांगली नाही ज्यांनी तो क्रमांक यापूर्वी वापरला होता.

जेव्हा तुमचा जुना क्रमांक नव्या युझरला असाईन केला जातो त्यावेळी तुमच्या नंबरशी निगडीत असलेल्या डेटाही त्या व्यक्तीला अॅक्सेस करणं सोपं असतं.

यामुळे जुना नंबर असलेल्या ग्राहकांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेवर घाला घातला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापीठाच्या संशोधकांनी मोठा खुलासा केला आहे की दूरसंचार कंपन्यांकडून जुन्या क्रमांकांच्या पुनर्वापराची संपूर्ण प्रक्रिया सुरक्षा आणि गोपनीयतेवर प्रश्न निर्माण करते.

नवीन युझर्स रिसाकल केलेल्या नंबरद्वारे जुन्या युझरच्या नंबरशी निगडीत माहिती अॅक्सेस करू शकतात.

जेव्हा तुम्ही तुमचा नंबर बदता तेव्हा अनेकदा त्वरित आपल्या डिजिटल खात्यात नंबर अपडेट करणं विसरून जाता. उदा. अनेकदा तुम्ही आपल्या ई कॉमर्स अॅपमध्ये जुन्या क्रमांकाचा वापर करत असता.

एका पत्रकारानं जेव्हा नवा नंबर घेतला तेव्हा त्याच्याकडे ब्लड टेस्ट आणि स्पा संदर्भातील काही मसेज येऊ लागले असं या अहवालात नमद करण्यात आलं आहे.

रिसर्चदरम्यान २०० रिसायकल मोबाईल क्रमांकांची एका आठवड्यापर्यंत तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ नंबर्सवर जुन्या युझर्सचे मेसेज आणि कॉल येत होते.

या क्रमांकावर अनेकदा ऑथेंटिकेशन असलेले मेसेज आणि ओटीपीदेखील आल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

यानंतर संशोधकांनी ८ संभावित धोके अधोरेखित केले, जे रिसायकल मोबाईल क्रमांकांमुळे उद्भवण्याची शक्यता आहे.

यातील पहिला धोका म्हणजे युझरवर फिशिंगचा हल्ला केला जाऊ शकतो. ज्याला रिसायकल करून पुन्हा नंबर देण्यात आला आहे त्यालादेखील हा धोका निर्माण होऊ शकतो असं यात नमूद करण्यात आलं आहे.

जेव्हा मेसेजेस विश्वासार्ह वाटतात त्यावेळी हा धोका अधिक वाढतो. हॅकर या फोन क्रमांकांचा वापर करून निरनिराळे अलर्ट, वृत्त, मोहीम, आणि रोबोकॉलसाठी साईनअप करण्यासाठी नंबरचा उपयोग करू शकतात.

Read in English