सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 19:28 IST2025-05-05T19:20:19+5:302025-05-05T19:28:57+5:30

WhatsApp वर एक नवीन प्रकारचा स्कॅम दिसून येत आहे.

आपल्या स्मार्टफोनमध्ये असे काही एप्स आहेत जे दिवसभरात सर्वात जास्त वापरले जातात. WhatsApp हे त्यापैकीच एक आहे. प्रत्येकजण WhatsApp वापरतं. लोक एकमेकांना मेसेज, कॉल आणि व्हिडिओ कॉल पाठविण्यासाठी याचा वापर करतात. याच दरम्यान सायबर फसवणुकीचं प्रकार वाढलं आहे.

आजकाल WhatsApp वर एक नवीन प्रकारचा स्कॅम दिसून येत आहे. या स्कॅमचं कोणतंही नाव नसलं तरी गुन्हेगारांची पद्धत अशी आहे की याला WhatsApp 'प्रोफाईल फोटो' स्कॅम म्हटलं जात आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळेही हा स्कॅम तुमच्या खात्यातून पैसे चोरू शकतो.

या स्कॅमची माहिती सरकारशी जोडलेल्या सायबर दोस्त या एक्स हँडलवर देण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांनी आजकाल एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. ते WhatsApp वर कोणालाही मेसेज पाठवतात आणि मी तुमच्या ओळखीचा आहे असं सांगितात. त्यांच्या प्रोफाईलवरील फोटो तुमच्या जवळच्या मित्रांपैकी किंवा कुटुंबातील सदस्याचा असू शकतो.

तुम्हाला वाटेल की अरे, या माणसाच्या फोटोत माझा मित्र आहे. त्यामुळे हा तुमच्या ओळखीचाच कोणीतरी असू शकतो. मग ती व्यक्ती तुम्हाला सांगेल की, अपघात झाला आहे किंवा काहीतरी अडचणीत आहे. जर तुम्हाला तुमचा मित्र प्रोफाईल फोटोमध्ये दिसला तर तुम्हाला ती व्यक्ती प्रामाणिक वाटेल. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल.

एक्‍सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी आवाजही बदलत आहेत. उदाहरणार्थ, ते तुम्हाला तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीच्या आवाजात एक ऑडिओ मेसेज पाठवतील. हे सर्व त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी केलं जातं.

एकदा विश्वास जिंकला की, पैशाची मागणी केली जाते. अशा परिस्थितीत लोक जास्त विचार करत नाहीत किंवा त्यांना नेमकं काय सुरू आहे हे समजत नाहीत. व्यक्तीला गरज असल्याने ते शक्य तितक्या लवकर पैसे ट्रान्सफर करतात. पण जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

अशा स्कॅमचा सुरुवातीचा उद्देश व्यक्तीचा विश्वास संपादन करणं असतो. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्याशी संपर्क साधला तर अलर्ट व्हा. जर त्याने तुमच्या ओळखीच्या व्यक्ती जसं की तुमचे वडील, आई, मित्र इत्यादींचे फोटो त्याच्या प्रोफाइल फोटोमध्ये एकत्र ठेवले असतील तर आधी तो कोण आहे याची खात्री करा.

तुम्ही तुमच्या मित्राला किंवा घरी थेट फोन करून सत्य जाणून घेऊ शकता. जर अशी व्यक्ती पैशाची मागणी करत असेल तर पैसे पाठवण्यापूर्वी, तो तुमचा मित्र आहे की तुमच्या ओळखीचा आहे हे शोधा. जर तुम्ही सुरुवातीला काळजी घेतली तर तुम्ही फसवणुकीचे बळी ठरणार नाही.