स्वस्त आणि मस्त लॅपटॉप हवा? 'हे' आहेत 30 हजारांच्या आत मिळणारे बेस्ट लॅपटॉप्स

By सिद्धेश जाधव | Published: May 30, 2022 11:08 AM2022-05-30T11:08:55+5:302022-05-30T11:29:31+5:30

30 हजार रुपयांच्या आत अनेक लॅपटॉप भारतात उपलब्ध आहेत. यातून कोणाची निवड करायची असा प्रश्न पडला असेल तर पुढे आम्ही या बजेट सेगमेंटमधील बेस्ट लॅपटॉप्सची यादी दिली आहे. यात 30,000 रुपयांच्या आत येणाऱ्या HP, Lenovo आणि Asus सह अनेक ब्रँड्सचा समावेश आहे.

या लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा HD अँटी ग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात Intel Pentium Quad-Core प्रोसेसर 4GB RAM सह दिला आहे. सोबत 1TB हार्ड ड्राइव्ह मिळते. विंडोज हॅलो सपोर्टसह येणारा हा लॅपटॉप तुम्ही 29,940 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

Infinix INBook X1 लॅपटॉप 14-इंचाच्या FHD IPS डिस्प्लेसह बाजारात येतो. यात 10th Gen Intel Core i3 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. सोबत 8GB RAM आणि 256GB NVMe SSD स्टोरेज मिळते. या लॅपटॉपची किंमत 29,990 रुपये ठेवण्यात आली आहे.

Intel Pentium Silver N5030 प्रोसेसरसह Acer Extensa 15 बाजारात आला आहे. 4GB RAM आणि 256GB स्टोरेज तुमची रोजच काम सहज हाताळू शकते. यात ब्लू लाईट शिल्डसह एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. 6.5 तासांचा बॅटरी बॅकअप असणारा Acer Extensa 15 लॅपटॉप तुम्ही 27,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

हा 2-in-1 कन्व्हर्टिबल क्रोमबुक आहे जो 28,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात Intel Celeron Dual-Core प्रोसेसरसह 4GB RAM आणि 128GB eMMC स्टोरेज देण्यात आली आहे. 10 तासांच्या बॅटरी बॅकअपसह येणारा हा लॅपटॉप 11.6-इंचाच्या HD IPS डिस्प्लेसह विकत घेता येईल.

हा लॅपटॉप 14-इंचाच्या HD अँटी ग्लेयर डिस्प्लेसह बाजारात आला आहे. यात कंपनीनं Intel Celeron Dual-Core प्रोसेसर दिला आहे. सोबत 4GB RAM आणि 256GB SSD स्टोरेज मिळते. Windows 11 वर चालणार हा लॉपटॉप तुम्ही 25,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

या 2-in-1 कन्व्हर्टिबल लॅपटॉपमध्ये 10.1-इंचाचा टच अँटी ग्लेयर IPS HD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Intel Celeron N4020 चिपसेटसह 4GB RAM आणि 128GB eMMC स्टोरेज मिळते. Lenovo IdeaPad D330 ची किंमत 23,490 रुपये आहे.

हा एक स्वस्तात मिळणारा 2-in-1 कन्व्हर्टिबल क्रोमबुक आहे जो तुम्ही 27,450 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. कंपनीनं यात AMD 3015CE प्रोसेसर दिला आहे सोबत AMD Radeon ग्राफिक्स मिळतात. 4GB RAM आणि 64GB eMMC स्टोरेजसह यात 14-इंचाचा एचडी टच डिस्प्ले मिळतो. HP Chromebook x360 लॅपटॉपची किंमत 27,450 रुपये आहे.

Lenovo V14-IGL मध्ये Intel Celeron N4020 प्रोसेसर मिळतो. Windows 11 वर चालणाऱ्या या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा FHD डिस्प्ले मिळतो. 10 तासांच्या बॅटरी बॅकअपसाठी यात 4GB RAM आणि 256GB SSD स्टोरेज मिळते. लेनोवोच्या या लॅपटॉपची किंमत 26,499 रुपये आहे.

Acer Aspire 3 लॅपटॉप Windows 11 ओएससह बाजारात आलं आहे. यातील 14-इंचाचा HD डिस्प्ले बेझल लेस डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 256GB SSD स्टोरेज आणि 4GB RAM दिला आहे. प्रोसेसिंगसाठी AMD Athlon 3020e प्रोसेसर आणि AMD Radeon ग्राफिक्स मिळतात. Acer Aspire 3 लॅपटॉपसाठी तुम्हाला 25,990 रुपये मोजावे लागतील.