एकेकाळी बुडाल्यात जमा होती Apple; स्टिव्ह जॉब्स, टिम कुक नाहीत, हे आहेत सावरणारे खरे हिरो...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 01:34 PM2023-04-21T13:34:26+5:302023-04-21T13:42:45+5:30

ती दोन वर्षे, अ‍ॅप्पल आज बुडेल, उद्या बुडेल अशी अवस्था होती. तो आला, त्याने पाहिले, एक निर्णय घेतला... स्टीव्ह जॉब्स परत आले... ते आले नसते तर... मग खरा हिरो कोण?

अ‍ॅप्पल या दिग्गज कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी दोन दिवसांत मुंबई आणि दिल्लीत दोन अॅप्पल स्टोअर सुरु केली. आज अॅप्पल जगातील सर्वात नावाजलेल्या कंपन्यांपैकी एक आहे. हीच कंपनी एकेकाळी बुडाल्यात जमा होती. आज एवढे यश कसे मिळवले? यामागे टिम कुक यांची संघर्षगाथा आहे. त्यांच्यामुळेच अ‍ॅपलला हे यश मिळाले आहे.

अ‍ॅप्पलसाठी टिम कुक हे नवसंजिवनी घेऊन आले. १९९८ मध्ये जेव्हा त्यांनी अ‍ॅप्पल कंपनीत नोकरी पत्करली तेव्हा कंपनी दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर होती. २००० मध्ये कुक हे कंपनीच्या सेल्स आणि मॅनेजमेंट विभागाचे उपाध्यक्ष झाले. यानंतर २००४ मध्ये ते मॅकिन्टोश डिव्हिजवनचे अंतरिम सीईओ आणि प्रमुख पदी राहिले. २००९ मध्ये ते आजारपाणामुळे काही काळ कंपनीपासून दूर राहिले. परंतू ऑगस्ट २०११ मध्ये स्टीव जॉब्स यांच्या मृत्यूनंतर टिम कुक यांना सीईओ पद मिळाले.

1990 च्या दशकात पर्सनल कॉम्प्युटरची बाजारपेठ जसजशी विस्तारली त्याच काळात इंटेल आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज पीसी क्लोनच्या कमी किंमतींमुळे बाजारपेठेतील आपला दबदबा गमावला. ऑगस्ट 1995 मध्ये, पॉवरबुक 5300 रिलीझ झाले. हे पहिले पॉवरपीसी-आधारित पॉवरबुक होते. पहिल्या काही युनिट्सपैकी बरेचसे पॉवरबुक हे बंद पडलेले होते. याचबरोबर अनेक उत्पादनांमध्ये सोनी-निर्मित लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरीजचा स्फोट झाल्याच्या घटना झाल्या होत्या. यामुळे अ‍ॅप्पलची बाजारातील प्रतिमा मलिन झाली.

PowerBook 5300 देखील बग्गी सिस्टम सॉफ्टवेअरसह पाठवले गेले. अ‍ॅप्पलकडे या साऱ्या गोष्टींमुळे पैशांची अडचण निर्माण होऊ लागली होती. ऍपलच्या बोर्डाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कंपनीचे पुनर्वसन करण्यासाठी 1996 मध्ये गिल अमेलियो यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली. त्यांनी आपल्या 500 दिवसांच्या कार्यकाळात टाळेबंदी, कार्यकारी पुनर्रचना आणि उत्पादनांवर लक्ष देणे यासारख्या व्यापक सुधारणांसह संघर्षशील कंपनीला पुन्हा यश मिळवून दिले.

1997 मध्ये, त्यांनी Apple च्या अयशस्वी ऑपरेटिंग सिस्टमचे निराकरण करण्यासाठी NeXT विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि कंपनीचे मूळ संस्थापक स्टीव जॉब्सना परत आणले, ज्यांनी त्या वर्षाच्या शेवटी CEO म्हणून अमेलियोंची जागा घेतली. इथून पुढे अप्पलची घोडदौड सुरु झाली.

अमेलियो यांना अ‍ॅप्पलच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी एक रणनीती लिहिली आणि प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधले. Apple कडे रोख आणि तरलतेची कमतरता आहे. कमी दर्जाची उत्पादने आहेत, व्यवहार्य ऑपरेटिंग सिस्टम स्ट्रॅटेजीचा अभाव आहे, एक बेशिस्त कॉर्पोरेट संस्कृती आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.

अमेलियो यांनी अ‍ॅप्पलच्या खर्चात कपात करून या समस्या सोडविण्यास सुरुवात केली. त्यांनी हजारोंनी कर्मचारी कमी केले आणि कॉपलँड ऑपरेटिंग सिस्टम प्रकल्प बंद केला. अमेलियोंचे योगदान आज जरी कमी लेखले जात असले तरी 4 फेब्रुवारी 1997 रोजी ऍपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्याकडून $402 दशलक्षांना नेक्स्ट विकत घेऊन अ‍ॅप्पलला वाचवले. हा त्यांचा मास्टरस्ट्रोक ठरला.

या मुळे मूळ संस्थापक परत अ‍ॅप्पलमध्ये आला. 26 जुलै 1997 रोजी, मॅक ओएस जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात मॅक ओएस 8 रिलीज करण्यात आली. Apple च्या विक्रीच्या अपेक्षेपेक्षा या ओएसची चौपट वेगाने विक्री झाली. पहिल्या दोन आठवड्यात 1.2 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या होत्या. सहा महिन्यांत ही विक्री ३ दशलक्षांवर गेली होती. तिथून पुढे स्टिव्ह जॉब्स आणि टिम कुक यांनी अ‍ॅप्पलची धुरा सांभाळली आणि आज कंपनी एवढ्या मोठ्या नंबरवर उभी आहे.