Sant Tukaram Maharaj Ringan : अकलूजमध्ये तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 13:26 IST2019-07-07T13:17:12+5:302019-07-07T13:26:32+5:30

हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर करत देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.
सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सराटी पुलावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वागत केले.
निरा नदी ओलांडून सुमारे ८.३० च्या सुमारास तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. त्यानंतर पालखी सोहळा अकलूजच्या दिशेने मार्गस्त झाला.
अकलूज येथे पालखी सोहळ्यासाठी प्रथम पोलीस बँडचे आयोजन केले होते. पालखी सोहळा अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला.
संत तुकाराम महाराजांचे गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात पार पडले.