भावाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला बहिणीनं जेलमध्ये पाठवलं पत्र...त्यानंतर प्रेम जडलं अन् लग्न केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:46 PM2021-08-20T12:46:57+5:302021-08-20T12:58:40+5:30

अमेरिकेच्या एका जेलमध्ये हैराण करणारं प्रकरण उघडकीस आलं आहे. याठिकाणी एका महिलेला तिच्या सावत्र भावाची हत्या करणाऱ्या आरोपीवर प्रेम झालं आहे. दोघांच्या प्रेमाची सुरुवात पत्राच्या माध्यमातून झाली. महिलेने तिच्या भावाची हत्या का केली? याचं कारण जाणून घेण्यासाठी गुन्हेगाराला पत्र लिहिलं.

त्यानंतर या पत्राचं उत्तरं हत्या करणाऱ्या गुन्हेगारानं दिलं. तेव्हापासून दोघांमध्ये संवाद सुरु झाला त्याचे रुपांतर पुढे जाऊन प्रेमात झालं. आता दोघांनीही लग्न केले आहे.

अमेरिकेतील कुयाहोगा काउंटी येथील ही पूर्ण घटना आहे. एप्रिल १९८९ मध्ये जॉन टिडजेनला ब्रायन मॅकगरीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कोर्टाने जॉनला ३२ वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याला जेलमध्ये पाठवण्यात आले.

ब्रायनची बहिण क्रिस्टल स्ट्रॉसला भावाची हत्या कशामुळे झाली याची माहिती नव्हती. त्यामुळे हत्येचं कारण शोधण्यासाठी तिने जेलमध्ये कैदेत असलेल्या गुन्हेगार जॉनला पत्र लिहिलं.

जेलच्या आत क्रिस्टलचं हे पत्र जॉनपर्यंत त्याच्या वकिलाने पोहचवलं. त्यानंतर पत्राचा सिलसिला सुरु झाला. क्रिस्टल जॉनच्या प्रेमात पडली. त्यानंतर जॉन जेलमधून बाहेर येण्याची वाट पाहू लागली. जॉनने ब्रायनची हत्या केल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याला ३२ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

जेलमधून शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर क्रिस्टलनं ५७ वर्षीय जॉनसोबत लग्न केले. ती म्हणाली मी जॉनवर खूप प्रेम करते आणि त्याच्याशिवाय जगू शकत नाही. जॉनने माझ्या सावत्र भावाची हत्या केली आहे परंतु त्यासाठी त्याने ३२ वर्ष शिक्षा भोगली आहे.

क्रिस्टलनं एका न्यूज चॅनेलला सांगितले की, मी जॉनवर प्रेम करते हे जाहीर आहे. जर मी त्याच्यावर प्रेम करत नसते तर त्याच्यासोबत इथं उपस्थित नसते. तर जॉन टिडजेननं सांगितलं की, तो क्रिस्टलवर खूप प्रेम करतो. आम्ही दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही.

मिररच्या रिपोर्टनुसार, क्रिस्टलचा सावत्र भाऊ ब्रायन मॅकगरी एका अपार्टमेंटर मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या हत्येचा आरोप जॉनवर लावण्यात आला. पोलिसांनी जॉनला अटक केल्यानंतर सुरुवातीला ब्रायननं आत्महत्या केल्याचं बनाव जॉननं केला. परंतु त्यानंतर स्वत:च्या रक्षणासाठी ब्रायनला मारल्याचं त्याने कबुल केले.

पोलिसांच्या रिपोर्टनुसार, मॅकगरीच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या खूणा आढळल्या होत्या तसेच त्याला गोळीही मारली होती. जॉनने सांगितले की, मॅकगरीने त्याला गोळी मारली होती. परंतु त्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. त्याच्या हातात न गन पावडर मिळाली न कुठल्याही प्रकारचे रक्ताचे डाग आढळले.

रिपोर्टनुसार, रायफलच्या बॅरेलवर ब्रायन मॅकगरीच्या रक्ताचे डाग सापडले. ज्यातून हे समोर आले की, त्याला खूप जवळून गोळी मारली होती. कुयाहोगा काऊंटी कोर्टद्वारे या प्रकरणात जॉनला दोषी ठरवत त्याला शिक्षा सुनावली होती. आता ३१ ऑगस्टला प्री ट्रायल सुनावणीसाठी त्याला कोर्टात बोलावले आहे.

Read in English