'या' ९ वर्षाच्या मुलाला का करायची आहे आत्महत्या?; कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 03:46 PM2020-02-22T15:46:12+5:302020-02-22T15:53:51+5:30

सध्याच्या युगात मुलांना हिरो-हिरोईनचं क्रेझ खूप असतं. कोणाला सलमान खानसारखी बॉडी हवी तर कोणाला करिनासारखी फिगर, अमिताभ बच्चनसारखी उंची कोणाला हवी तर विद्या बालनसारखे लांबलचक केस, मात्र का? कारण जगात सुंदर तेच दिसतात कारण ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत

आयुष्यमान खुराणाचा सिनेमा आहे त्यात म्हटलंय की, 'आप मोटे, काले, नाटे, गंजे चाहे जैसे भी दिखते हो, अगर आप खुद से प्यार करेंगे तो दुनिया भी आपसे प्यार करेगी' पण सिनेमातलं डायलॉग खरा असता तर ऑस्ट्रेलियातील ९ वर्षाचा मुलगा आत्महत्येचा विचार करत नसता

सोशल मीडियावर या मुलाची कहाणी व्हायरल झाली आहे. जगभरातील त्याच्याबद्दल सहानभुती व्यक्त केली जात आहे. मात्र हेच जग जेव्हा आपल्या शारिरीक विकलांगावर हसायला लागतं, त्याची चेष्टा करुन आनंद घेतं.

अनेकदा ही चेष्टा इतकी गंभीर बनते ज्यामुळे समोरचा व्यक्ती आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतो. ऑस्ट्रेलियाच्या Quaden Bayles या ९ वर्षाच्या मुलासोबत हा प्रकार घडला.

अलीकडेच या मुलाच्या आईने Yarraka Bayles ने फेसबुकवर लाइव्ह केलं. यामध्ये तिचा मुलगा कारमध्ये जोरजोराने डोकं आपटून रडताना दिसत आहे. तो आईला सांगतो मला चाकू दे, मला स्वत:ला मारुन टाकायचं. हा मुलगा Achondroplasia या आजाराने ग्रस्त आहे. त्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

मुलाच्या आईने सांगितले की, शाळेत तिच्या मुलाला उंची कमी असल्याने चिडवलं जातं. ज्यामुळे त्याला स्वत:चा राग येऊ लागलाय, त्यामुळे ही आई विनवणी करते की, तुम्ही तुमच्या मुलांना कुटुंबाला आणि मित्रांना तालीम देऊ शकता का की ते दुसऱ्यांची चेष्टा करु नये. सोशल मीडियावर #WeStandWithQuaden असा ट्रेंडही व्हायरल होत आहे.

मुलाचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावूक झाले. यामध्ये प्रसिद्ध कॉमेडियन Brad Williams सुद्धा आहे. जे स्वत: उंचीने कमी आहे. त्यांनी या मुलासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन केले आहे. ज्यामधून जवळपास १ कोटी रुपये जमा झाले आहेत.

त्याचसोबत अशा प्रवृत्ती तुमच्यासोबत होत असेल तर त्याला सामना करा, कारण जिंदगी गुलजार है असं म्हणत काही मूठभर लोकांसाठी जीवन संपवण्याचा निर्णय खूप चुकीचा आहे. Quaden चा व्हिडिओ ४ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.