कोण आहे तन्वी गडकरी? IND vs USA मॅचमधल्या एका डान्समुळे झाली VIRAL; सोशल मीडियावरही चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:09 IST2026-02-09T13:09:48+5:302026-02-09T14:09:57+5:30
Who is Tanvi Gadkari T20 World Cup 2026 Mystery Girl: सुर्यकुमारने षटकार मारताचे तन्वीने धम्माल डान्स केला आणि कॅमेरामनने तो टिपला

Who is Tanvi Gadkari T20 World Cup 2026 Mystery Girl:
क्रिकेट आणि ग्लॅमर या दोघांचे नाते खूपच जुने आहे. त्यातच हल्ली क्रिकेट मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमधली काही चेहरे झटपट व्हायरल होतात आणि चर्चेत येतात.

अलीकडेच वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध अमेरिका आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ सामन्यादरम्यान भारतीय संघाची जर्सी घातलेली एक मिस्ट्री गर्ल चर्चेत आली.

ही मिस्ट्री गर्ल म्हणजे मुंबईतील अभिनेत्री, डान्सर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर तन्वी गडकरी. तिचे लाइव्ह सामन्यातील काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सूर्यकुमार यादवने जेव्हा मोठा फटका खेळला होता, त्यावेळी ती कॅमेरा समोर डान्स करताना दिसली, त्यामुळे हा व्हायरल व्हिडिओ जास्त व्हायरल होताना दिसत आहे.

तन्वीनेदेखील स्वतः हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने स्टेडियममधील पहिला क्रिकेट सामना एन्जॉय करत असल्याचे कॅप्शन दिले आहे.

तन्वीने अभिनय कारकिर्दीची सुरुवात वेब सिरीज आणि म्युझिक व्हिडिओतून केली. कॅम्पस बीट या वेब सिरीजमध्ये रिहानाच्या भूमिकेतून तिला स्वत:ची ओळख मिळाली.

याव्यतिरिक्त, तिने जमनापार या वेब सिरीजमध्येही काम केले आहे आणि अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये तिच्या डान्सिंग स्किल्स दाखवल्यात. ज्यामुळे ती लोकप्रिय झाली आहे.

तन्वीला तिच्या डान्स व्हिडिओ, लाईफस्टाईल पोस्ट आणि ब्रँड कोलॅबोरेशन कंटेंटमुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असल्याने, तिची लोकप्रियता वाढत आहे.


















