बोंबला! ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला शेवटचं भेटायला बोलावलं; अन् असा घेतला बदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 15:02 IST2020-12-06T14:37:05+5:302020-12-06T15:02:45+5:30

रिलेशनशीपमध्ये ब्रेकअप, पॅचअप होणं हे काही नवीन नाही. ब्रेकअपनंतर प्रत्येकांच्या रिएक्शन्स वेगवेगळ्या असतात. काहींना उदास, शांत राहावसं वाटतं तर अनेकजण पार्टनरवर राग व्यक्त करतात. अशीच एक ब्रेकअपची घटना समोर आली आहे.
प्रेयसीसह ब्रेकअप झाल्यानंतर बदला घेण्यासाठी एक्स पार्टनरने जीवघेणा हल्ला केला आहे. प्रेयसीशी संबंध संपल्यानंतर तिच्यावर वार केल्याची घटना समोर आली आहे.
मार्क मॅकलिन या मुलाने ४ महिन्यांचे संबंध तोडले म्हणून एक्स गर्लफ्रेंडवर वार केले आहेत. ३२ वर्षीय मुलाने १९ वर्षीय एक्स गर्लफ्रेंडवर वार केले. या दोघांची भेट ऑनलाईन झाली होती. चार महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या मुलीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
ब्रेकअपनंतर मार्कने या मुलीला एकदा भेटण्याची विनंती केली. याच संधीचा फायदा घेत बदला घेण्यासाठी मार्कने या तरूणीवर चाकूने वार केले.
सोशल मीडियावर या तरूणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सदर तरूणीची स्थिती गंभीर असून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. (Image Credit- Daily Mail, news.com.au)