Rohit Sharmaची पत्नी रितिकाच्या हातातल्या महागड्या पर्सची रंगली चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:01 IST2026-01-13T14:55:06+5:302026-01-13T16:01:56+5:30

Rohit Sharma wife Ritika Sajdeh Handbag Price: रोहित आपल्या पत्नीसोबत रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला आला होता.

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्यातील केमिस्ट्री खूपच चर्चेत असते.

रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स संघासोबत खूप वर्षांपासून खेळतो आहे. नुकताच मुंबई इंडियन्सतर्फे एक कार्यक्रम घेण्यात आला.

रोहित शर्मासोबत या कार्यक्रमात त्याची पत्नी रितिका सजदेह देखील हजर होती. तिने गडद रंगाचा सुंदर वनपीस परिधान केला होता.

त्यासोबतच रितिकाने अतिशय रेखीव असे गोल डायलचे घड्याळ आणि ब्राऊन हील्स घातले होते आणि हातात एक क्लच हँडबॅग होती.

या कार्यक्रमात येताना रितिकाने जी क्लच हँडबॅग हातात घेतली होती, त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

रितिकाच्या हातातल्या या पर्सची किंमत किती असेल? अशी चर्चाही सध्या इंटरनेटवर सुरु आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर...

रितिकाची ही बॅग लुई वितॉन पेटीट मॅल (louis vuitton petite malle) बॅग असून तिची किंमत सुमारे ६ लाख रुपये इतकी आहे.