डुकराची अशीही कलाकारी; पेंटींग करून कमवतोय लाखो रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 04:48 PM2019-03-20T16:48:31+5:302019-03-20T17:05:11+5:30

दक्षिण भारतातील एक डु्क्कर जगभरात लोकप्रिय होत आहे. पण हा डुक्कर सामान्य नसून एक खास प्रकारचा आर्टीस्ट आहे. हा डुक्कर तोंडात ब्रश पकडून वेगवेगळ्या पेंटींग करतो. इतकेच नाही तर त्याने काढलेल्या अनेक पेंटींग्स लाखो रूपयांना विकल्याही जातात. तसेच या डुकराने तयार केलेल्या पेंटींगचं प्रदर्शनही भरवलं जातं.

दक्षिण आफ्रिकेत या डुकराला फार जास्त लोकप्रियता मिळत आहे. त्याचं नाव पिकासोच्या नावावरून प्रेरणा घेऊन पिगकासो ठेवण्यात आलं आहे. पिगकासोच्या पेंटिंग्स दुसऱ्या देशांमध्येही विकल्या जात आहेत. तसेच यातून लाखो रूपयांची कमाई केली जात आहे. (Image Credit : pigcasso.org)

पिगकासोला त्याच्या बहिणीसोबत केवळ दोन महिन्यांचा असताना कत्तलखाण्यातून वाचवण्यात आले होते. सर्वात खास बाब म्हणजे त्याच्या दातांमध्ये ब्रश दिला जातो आणि समोर कॅनव्हास ठेवला जातो. तेव्हा पिगकासो ब्रश रंगांमध्ये भिजवून कॅनव्हासवर पेंटींग करण्यास सुरूवात करतो. यातून अनेक वेगळ्या पेंटींग तयार होतात. (Image Credit : pigcasso.org)

पिगकासोच्या या पेंटींगचं नाव अमेझॉन ठेवण्यात आलं आहे. pigcasso.myshopify.com नावाच्या वेबसाइटवर त्याच्या पेटींगचं प्रदर्शन बघायला मिळतं. या साइटवर पिगकासोच्या ६४ पेंटींग आहेत. पेंटींगसोबत त्यांच्या किंमतीही देण्यात आल्या आहेत.

पिगकासो एक मादा डुक्कर असून ती २१ महिन्यांची आहे. ही मादा डुक्कर जगातली एकुलती एख पिग पेंटर आहे. काही दिवसांपूर्वीच तिचं आर्ट वर्क ३००० पाउंडला विकलं गेलं. तसेच ४४ पेंटींग्स वेगळ्या देशात विकल्या गेल्या.

साऊथ आफ्रिकेतील प्राणीमित्र जोयने लेफनसने या डुकराला एका फार्ममधून वाचवले होते. त्यानंतर एका दुसऱ्या फार्ममध्ये ठेवले. पिगकासोचा सांभाळ करणारी जोयने सांगते की, 'डुकरं फार स्मार्ट जनावरं असतात'. (Image Credit : www.express.co.uk)

पिगकासोच्या नव्या पेंटींगचं नाव ब्रेक्झिट आहे. ज्यात तिने ब्रिटीश ध्वजाचे रंग पेंटींगमध्ये रेखाटले आहेत. ही पेंटींग १७३० पाऊंडमध्ये विकली गेली. तर तिची आणखी एक पेंटींग न्यू यॉर्कमधील एका वकिलाने खरेदी केली होती. (Image Credit : New York Post)

गेल्या महिन्यात पिगकासोची एक पेंटींग प्रदर्शनी केपटाऊनमध्ये लागली होती. पुढील महिन्यात एक पेंटींग प्रदर्शन सेंट्रल लंडनमध्ये लागणार आहे. नंतर पॅरिस, बर्लिन इथेही होणार आहे. ( Image Credit : www.express.co.uk)

(Image Credit : www.express.co.uk)