वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला

By manali.bagul | Published: December 15, 2020 03:28 PM2020-12-15T15:28:18+5:302020-12-15T15:37:16+5:30

भावा बहिणीच्या भांडणाला आणि प्रेमाला काही सीमाच नसते. लहान सहान गोष्टींवर भांडणारे भाऊ बहिण प्रसंगी आपल्या भावासाठी किंवा बहिणीसाठी जीव ओवाळून टाकायला तयार होत असतात अशीच एक घटना जळगावमधून समोर येत आहे.

जळगाव शहरातील नवविवाहित बहिणीला तिच्या भावांनी एक सुखद धक्का देत तिला माहेरी आणण्यासाठी चक्क हेलीकॉप्टरमधून सफर घडवित माहेरी आणलं. कावडीया परिवाराकडून लाडक्या बहिणीचे झालेले हे भन्नाट स्वागत शहरात चर्चेचा विषय झाले होते.

सागर पार्कवर दुपारी हे हेलीकॉप्टर उतरल्यानंतर नागरिकांनीही हेलीकॉप्टरसह नवदाम्पत्याला पाहायला गर्दी केली होती. कावडीया कुटुंबातील शिवानी अशोक कावडीया हिचा विवाह परळी वैजनाथ येथील प्रथितयश जैन परिवारातील डॉ. कुणाल यांच्यासोबत झाला. शिवानी लग्नानंतर प्रथमच माहेरी येणार होती.

कावडीया कुटुंबातील शिवानी अशोक कावडीया हिचा विवाह परळी वैजनाथ येथील प्रथितयश जैन परिवारातील डॉ. कुणाल यांच्यासोबत झाला. शिवानी लग्नानंतर प्रथमच माहेरी येणार होती.

हे हेलीकॉप्टर विमानतळावर उतरण्याचे नियोजन होते. मात्र, विमानतळावर धावपट्टीवर कारपेंटिंगचे काम सुरू असल्याने प्रशासनाकडून नकार देण्यात आला. यावर मार्ग काढत सर्व शासकीय परवानगी घेऊन हेलिकॉप्टर सागर पार्कवर हेलीपॅड तयार करून उतरविण्यात आले.

दरम्यान, शिवानीच्या स्वागतासाठी अमित जगताप, समीर कावडीया, विपीन कावडीया, पियुष हसवाल, संदीप सूर्यवंशी, प्रीतम शिंदे, प्रतीक कावडीया, आयुष्य कस्तुरे, तृष्णात तिवारी, पंकज सुराणा, पवन चव्हाण, प्रशांत वाणी आदी उपस्थित होते.