#quarantinepillowchallenge : कपड्यांऐवजी मुलींनी अंगावर फक्त बांधली उशी, फोटो पाहून म्हणाल, ही फॅशन अशी गं कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:34 IST2020-04-21T12:17:23+5:302020-04-21T12:34:04+5:30
#quarantinepillowchallenge या चॅलेन्जमध्ये मुली कपड्यांऐवजी केवळ उशी शरीरावर बेल्टच्या मदतीने बांधतात आणि फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात.

लॉकडाऊनमुळे लोक घरात बसून बसून कंटाळले आहेत. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी आणि मूड चांगला ठेवण्यासाठी वेगवेगळ चॅलेन्ज सोशल मीडियात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच टी-शर्ट चॅलेन्ज सुरू होतं. आता #quarantinepillowchallenge सुरू आहे.
या चॅलेन्जमध्ये मुली कपड्यांऐवजी केवळ उशी शरीरावर बेल्टच्या मदतीने बांधतात आणि फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात.
चॅलेन्जसाठी मुलींनी शरीरावर उशी तर बांधली. पण याने त्यांना एक स्टायलिश लूकही मिळाला आहे.
उशी शरीरावर बांधण्यासाठी त्यांनी डिझायनर बेल्ट्सचा वापर केला आहे.
इतकेच नाही तर काही मुली तर अशा तयार झाल्या आहेत की, त्या आता लगेच पार्टीला जातील.
ज्याप्रमाणे मुली बाहेर जाताना व्यवस्थित तयार होतात. तशाच या चॅलेन्जसाठी तयार झाल्या आहेत. पण फरक इतकाच आहे की, त्या बाहेर जाऊ शकत नाही.