पुरुषांपेक्षा महिलांना जास्त गोड खावंसं वाटतं, तोंडाला पाणी सुटतं! या भयानक क्रेव्हिंगचं रहस्य..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:18 IST2025-07-02T14:44:19+5:302025-07-02T15:18:29+5:30

Sweet Craving In Women : हा केवळ टेस्टचा मुद्दा नसून यामागे शरीरातील हार्मोन्स, ब्रेन केमिकल प्रोसेस आणि इमोशनल गोष्टींचाही समावेश असतो.

Sweet Craving In Women : मिठाई खाणं सगळ्यांनाच आवडतं. महिला असो वा पुरूष मिठाई बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मात्र, अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, पुरूषांच्या तुलनेत महिलांना गोड खाण्याची क्रेविंग म्हणजे इच्छा जास्त होते. हा केवळ टेस्टचा मुद्दा नसून यामागे शरीरातील हार्मोन्स, ब्रेन केमिकल प्रोसेस आणि इमोशनल गोष्टींचाही समावेश असतो.

TOI च्या एका रिपोर्टनुसार, महिलांच्या शरीरात मासिक पाळी, गर्भावस्था आणि मेनोपॉज दरम्यान हार्मोन जसे की, अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेव्हल बदलत राहते. हार्मोन्समधील बदलामुळे मूड आणि भूकही प्रभावित होते. जेव्हा शरीरात सेराटोनिन हार्मोन कमी होतात, तेव्हा गोड खाण्याचा क्रेविंग होते. गोड खाल्ल्यानं हे हार्मोन वाढतात. त्यामुळे जेव्हा मूड खराब असतो, तेव्हा महिला गोड खाणं पसंत करतात. मिठाई खाल्ल्यावर त्यांचा मूड चांगला होतो.

तणावामुळे महिलांची शुगर क्रेविंग वाढते. तणावावेळी शरीरात घ्रेलिन हार्मोन वाढतात, जे भूक वाढवतात. यादरम्यान लेप्टि हार्मोन कमी होतात, जे भूक कमी करतात. हे बदल महिलांमध्ये अधिक होतात, त्यामुळे तणावात त्या जास्त गोड खातात.

आपल्या पोटात गुड बॅक्टेरिया असतात, ज्यांना गट मायक्रोबायोम म्हटलं जातं. हे बॅक्टेरिया सुद्धा खाण्याची इच्छा प्रभावित करतात. खासकरून एस्ट्रोबायोम नावाचे बॅक्टेरिया अॅस्ट्रोजन हार्मोनला प्रभावित करतात. मासिक पाळीदरम्यान हे बॅक्टेरिया वाढतात-कमी होतात, ज्यामुळे महिलांमध्ये गोड खाण्याची क्रेविंग होते. जास्त गोड खाल्ल्यानं बॅक्टेरिया आणखी वाढतात, ज्यामुळे क्रेविंग सतत वाढत राहते.

मासिक पाळीच्या आधी महिलांच्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. कारण यादरम्यान शरीर प्रेग्नेन्सीची तयारी करतं. यादरम्यान महिला जास्त कॅलरी आणि गोड खाणं पसंत करतात. कारण यातून त्यांना लगेच ऊर्जा मिळते. हेच कारण आहे की, यावेळी महिलांना गोड खाण्याची जास्त इच्छा होते.

पुरूषांची क्रेविंग्स महिलांपेक्षा वेगळी असते. पुरूषांच्या हार्मोन्स जास्त स्थिर राहतात. खासकरून टेस्टेस्टोरॉनमुळे पुरूषांचे हार्मोन्स जास्त स्टेबल राहतात. यामुळे पुरूषांना क्रेविंग कमी होते. पुरूषांना जास्त चटपटीत किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ खायला आवडतं. तर महिलांना गोड खायला आवडतं.

सामाजिक आणि मानसिक कारणही खाण्याच्या इच्छांना प्रभावित करतात. महिला सौंदर्य, डायटिंग आणि भावनात्मक आरामासाठी जास्त मिठाई खातात. पुरूषांमध्ये असा दबाव कमी असतो. त्यामुळे दोघांच्या क्रेविंगमध्ये फरक असतो.

रिसर्च सांगतात की, पुरूष क्रेविंग चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करू शकतात. हार्मोनची स्थिरता आणि मेंदुच्या प्रतिक्रियांम्ये अंतर असल्यानं पुरूष आपल्या भूकेवर जास्त नियंत्रण ठेवतात, तर महिलांसाठी हे जरा अवघड असतं.