थंडीत कोमट पाणी प्यायल्यानं वजन कमी होतं? वेट लॉससाठी जेवल्यानंतर गरम पाणी प्यावं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 22:09 IST2025-11-19T21:46:43+5:302025-11-19T22:09:52+5:30

जेवणाच्या सुमारे अर्धा तास आधी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानं भूक कमी होते ज्यामुळे जेवणात कमी कॅलरीज घेतल्या जातात.

जेवणानंतर गरम पाणी (Hot Water) पिणे वजन कमी करू शकते पण परंतू थेट वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत यामुळे मदत होत नाही. गरम पाण्यामुळे शरीरातील चयापचन दर वाढण्यास मदत होते. काही अभ्यासानुसार जेवणापूर्वी कोमट पाणी प्यायल्यानं चयापचन दर वाढू शकतो ज्यामुळे कॅलरीज अधिक प्रभावीपणे बर्न होतात. (What Will Happen If You Drink Hot Water After Eating)

जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. पाणी पचनसंस्थेला दुरूस्त करते ज्यामुळे पचनात कठीण असलेले अन्न पचण्यास मदत होते. ज्यामुळे अन्न जलद गतीनं पचते आणि पोषक तत्व शोषली जातात. यामुळे बद्धकोष्टतेची समस्या कमी होते. जी अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यात उपयोगी ठरते.

कोमट पाणी शरीरातील फॅट रेणूंचे लहान भागांमध्ये रुपांतर करण्यास मदत करतात ज्यामुळे पचनसंस्थेला ते बर्न करणं सोपं जातं.

जेवणाच्या सुमारे अर्धा तास आधी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानं भूक कमी होते ज्यामुळे जेवणात कमी कॅलरीज घेतल्या जातात.

गरम पाणी प्यायल्यानं शरीराचे तापमान वाढते आणि घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात ज्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते.

वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणं खूप महत्वाचे आहे. गरम पाणी पिणं हा केवळ वेट लॉससाठी मदत करणारा एक पुरक उपाय आहे.

हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी गरम पाणी प्यायल्यानं शरीरात उत्साह राहतो आणि शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते.