काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:51 IST2025-04-30T17:42:13+5:302025-04-30T17:51:44+5:30
चला तर मग जाणून घेऊया चालण्याने आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो.

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स काढून टाकण्यासाठी, नेहमीच स्ट्रिक्ट डाएट प्लॅन आणि हेवी वर्कआऊटची करण्याची आवश्यकता नसते.
फक्त चालण्याने तुम्ही सहज वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त सातत्य राखावं लागेल. चला तर मग जाणून घेऊया चालण्याने आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो.
जर तुम्ही नुकतंच चालायला सुरुवात केली असेल तर सर्वप्रथम दररोज किमान २-३ किलोमीटर चालण्याची सवय लावा.
चालण्यामुळे तुमचे मेटाबॉलिज्म सुधारेल, वजन लवकर कमी होईल आणि तुमचे हृदयाचं आरोग्यही चांगले राहील. मूड फ्रेश राहिल.
आता काही दिवसांनी, वजन लवकरात लवकर कमी करण्यासाठी चालण्याचा वेळ वाढवा आणि ५-७ किलोमीटर चालायला सुरुवात करा.
इतके चालल्याने तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारेल, फॅट बर्न होतील. तुमच्या दिनचर्येत ही गोष्ट समाविष्ट करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता.
आता तुम्हाला चालण्याची सवय झाली असेलच. आता तुमच्या चालण्याच्या वेगावर काम करा कारण वजन कमी करण्यासाठी चालण्याचा वेग देखील महत्त्वाचा असतो.
तुम्ही जितक्या वेगाने चालाल तितके जास्त फॅट्स बर्न होतील.याशिवाय चालताना, तुमच्या काही सवयींची देखील थोडी काळजी घ्या.
जसं की फिरायला जाण्यापूर्वी स्वतःला हायड्रेटेड ठेवा. शुगर ड्रिंक आणि प्रोसेस्ड फूड खाणं टाळा. तसेच चांगली झोप घ्या.