हळदीचं दूध की हळदीचं पाणी-कोणत्यावेळी काय प्यायल्यानं शरीराला जास्त फायदे मिळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 21:24 IST2025-09-22T20:59:06+5:302025-09-22T21:24:00+5:30

Turmeric milk Vs turmeric water: हळदीचं दूध रात्री झोपण्यापूर्वी पिणं जास्त फायदेशीर आहे,

हळदीचं दूध आणि पाणी दोन्हींचा आहारात समावेश करणं उत्तम आहे. हळदीचं दूध,ज्याला 'गोल्डन मिल्क' (Golden Milk) असेही म्हणतात,ते आयुर्वेदात खूप महत्त्वाचं मानलं जातं. (Turmeric milk Vs turmeric water)

हळदीचं दूध रात्री झोपण्यापूर्वी पिणं जास्त फायदेशीर आहे, विशेषतः जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल किंवा हाडांशी संबंधित समस्या असतील.

सकाळी उपाशी पोटी पिणं जास्त फायदेशीर आहे.जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, पचनक्रिया सुधारायची असेल किंवा त्वचा चांगली ठेवायची असेल, तर हळदीचं पाणी हा उत्तम पर्याय आहे.

हळद आणि दूध एकत्र आल्याने शरीराला उष्णता मिळते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि घसादुखीमध्ये आराम मिळतो.हळदीतील कर्क्युमिन नावाचा घटक शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो. दुधामुळे ते जास्त प्रभावीपणे काम करते.

हळदीचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते.

जर तुम्हाला दिवसभर एनर्जी हवी असेल तर सकाळी हळदीचं पाणी प्या. याऊलट रात्री रिलॅक्स झोपायचे असेल रात्री हळदीचं दूध पिणं हा चांगला पर्याय आहे.