बाल्कनीत 'या' ५ फुलांची रोपं लावा; रंगबिरंगी फुलपाखरांनी भरेल बाल्कनी-घराचं वाढेल सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:41 IST2026-01-12T09:08:00+5:302026-01-12T18:41:27+5:30
5 Plants That attract Butterflies : झेंडूची फुलं तीव्र वास आणि पिवळ्या रंगासाठी ओळखली जातात. पिवळ्या रंगांकडे फुलपाखरं आकर्षीत होतात.

तुमच्या बाल्कनीमध्येही रंगेबिरंगी फुलपाखरं यावी असं तुम्हाला वाटत असेल तर काही रोपं तुमची मदत करू शकतात. (5 Plants That attract Butterflies)

फुलपाखरांना आकर्षीत करणारी ही ५ रोपं तुम्ही लावली तर भरपूर फुलपाखरं येतील आणि वातावरणही चांगलं राहील.

लँटाना फुलपाखरांचे सर्वात आवडते रोप मानले जाते. या छोटया छोट्या फुलांचा गुच्छ लाल, पिळा, नारंगी, गुलाबी या रंगात असतो. याचा विशिष्ट सुवास फुलपाखरांना आकर्षीत करतो.

झेंडूची फुलं तीव्र वास आणि पिवळ्या रंगासाठी ओळखली जातात. पिवळ्या रंगांकडे फुलपाखरं आकर्षीत होतात.

पेंटासची फुलं छोट्या चांदण्यांप्रमाणे दिसतात. गडद लाल गुलाबी रंगांची फुलं फुलपाखरांना आकर्षीत करतात.

मेक्सिकन पेटुनियाची नीळी आणि वांगी रंगाची फुलं अशा लोकांसाठी आहेत ज्यांच्या बाल्कनीत थेट सुर्यप्रकाश येतो. कारण सकाळच्यावेळी ही फुलं उमलतात.

कढीपत्त्याचे रोप फुलपाखरांना आवडते. हे रोप कॉमन मॉर्मन आणि लाईम बटरफ्लाय साठी होस्ट प्लांटचे काम करते. ही पानं खाऊन कढीपत्ताचे रोप वाढते.

फुलपाखरांना आकर्षीत करण्यासाठी रोपं अशा ठिकाणी ठेवा जिथे ५ते ६ तास ऊन येतं. कारण फुलपाखरांना उन्हात उडायला आवडतं.

















