भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:12 IST2025-11-14T11:54:17+5:302025-11-14T12:12:03+5:30
Divya Jhariya : पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर, तिच्या जोडीदाराने तिला प्रेरणा दिली. दिव्या डीएसपी पदापर्यंत कशी पोहोचली हे जाणून घेऊया...

मध्य प्रदेशातील दिव्या झरिया आणि तिचा बॉयफ्रेंड आदित्य तिवारी यांची कौतुकास्पद गोष्ट समोर आली आहे. या दोघांनीही फक्त एकत्र राहण्याचं वचन दिलं नाही तर नागरी सेवांची तयारी करताना एकमेकांना भक्कम पाठिंबाही दिला. आता दोघंही पती-पत्नी आहेत.

दिव्याने दोनदा पीसीएस उत्तीर्ण केली, परंतु इंजिनिअरिंगनंतरचा तिचा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर, तिच्या जोडीदाराने तिला प्रेरणा दिली. दिव्या डीएसपी पदापर्यंत कशी पोहोचली हे जाणून घेऊया...

सोशल मीडियावरील एका पोस्टनुसार, दिव्या झरिया ही मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील आहे. तिने तिथेच शिक्षण घेतले. ती नेहमीच हूशार होती. यामुळे तिने बारावीनंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडलं. यानंतर तिला एका कंपनीत नोकरी मिळाली.

जेव्हा दिव्याने तिच्या कुटुंबाशी संवाद साधला तेव्हा तिला सरकारी नोकरीचा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर तिने तयारी सुरू केली. २०१८ मध्ये, दिव्याने पहिल्यांदाच एमपीपीसीएस (मध्य प्रदेश नागरी सेवा परीक्षा) दिली. तिने प्रिलिम्स उत्तीर्ण केले, परंतु कौटुंबिक परिस्थितीमुळे तिला घरी परतावं लागलं.

दिव्या मुख्य परीक्षेला बसू शकली नाही. तिने हार मानली नाही आणि पुढे जात राहिली. तिने अपयशाची कारणं समजून घेतली, त्यावर काम केलं आणि पुढच्या वेळी आणखी चांगली तयारी केली.

२०२० मध्ये, दिव्याच्या कठोर परिश्रमाचं फळ मिळालं. एमपीपीएससी परीक्षेत तिची कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी निवड झाली. तिथून तिला जाणवं की सिव्हिल सेवा फक्त काही पावलं दूर आहे.

दिव्याच्या या प्रवासातील सर्वात सुंदर भाग म्हणजे तिचं नातं. आदित्य आणि दिव्या शाळेतील मित्र-मैत्रिणी आहेत. तयारी दरम्यान ते रिलेशनशिपमध्ये होते. आदित्यने तिला उत्तम साथ दिली. वेळापत्रक तयार करण्यास मदत केली.

सतत अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. निकाल जाहीर झाला तेव्हा दिव्याचे नाव डीएसपी म्हणून समोर आलं. दिव्याने बॉयफ्रेंड आदित्य तिवारीशी लग्न केलं. आदित्य देखील मोठा अधिकारी आहे.

दिव्याने तयारीसाठी योग्य दिशेने कठोर परिश्रम केले. प्रथम तिने सिलॅबस पूर्ण केला आणि नंतर रिव्हिजनवर लक्ष केंद्रित केलं. दिव्या म्हणते की, मेन्ससाठी, प्रथम चांगल्या कंटेंटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

जर कोणी कोचिंगसाठी घराबाहेर जात नसेल, तर ते कुठूनही अभ्यास करू शकतात, परंतु त्यांनी योग्य स्ट्रॅटर्जीसह पुढे जाण्याची आवश्यकता आहे. दिव्या आणि आदित्यची आजची कहाणी आज अनेकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहे.

















