दारी तुळस हिरवीगार, मग लांब राहतील किरकोळ आजार! पाहा तुळशीचं पाणी पिण्याचे फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 16:53 IST2025-05-26T16:25:22+5:302025-05-26T16:53:31+5:30

See the benefits of drinking basil water, illnesses will stay away! : रोज तुळशीचे पाणी प्या. पाहा किती फायदे आहेत.

तुळशीला आपल्याकडे देवाचे स्थान दिले जाते. तुळस ही विविध कार्यांमध्ये वापरतात तसेच पुजेच्या सामग्रीत तुळशीचे पाने असतात. तीर्थ पिताना कधी नीट पाहीले तर त्यात तुम्हाला तुळशीचे पान दिसेलच.

तुळस दारात असायलाच हवी अशी भारतीय मान्यता आहे. त्यामागे कारणेही तशीच आहेत. तुळस फार औषधी असते. त्यामुळे आयुर्वेदात तुळशीला औषध असेच म्हटले जाते.

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तसेच त्यामुळे सर्दी बरी होते आणि ताप खोकलाही. त्यामुळे पावसाळ्यात आहारात तुळस असावीच.

तुळशीमध्ये अ‍ॅडॅप्टोजेनिक गुणधर्म असतात, जे ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुळशीचे पाणी प्यायल्याने मानसिक शांतता मिळते आणि मनही शांत राहते.

तुळशीचे पाणी पचनसंस्थेच्या कार्यक्षमतेसाठी अगदी उत्तम आहे. ते पचन एंझाइम्सच्या निर्मितीस चालना देते आणि गॅस, अपचन, आणि सूज यांसारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करते.

श्वसनमार्गात काही अडथळे येऊ नयेत. तसेच संसर्ग होऊ नयेत यासाठी तुळशीचे पाणी उपयुक्त ठरते. तुळशीत अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात.

तुळशीमध्ये असलेले फाइटोकेमिकल्स इन्सुलिनच्या प्रमाणात सुधारणा करतात आणि इन्सुलिनचे काही त्रास असतील तर बरे करतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेहाचा त्रास होत नाही.

वजन कमी करण्यासाठी अगदीच फायद्याचे असे हे पाणी आहे. पाण्यात तुळस उकळवायची आणि रोज सकाळी तसे पाणी प्यायचे आरोग्यासाठी अगदीच फायद्याचे ठरेल. वजन कमी करण्यासाठी मदत होईल.