नुसतं गरम दुधात हळद घालून पिण्याचा फायदा नाही, रोज 'या' पद्धतीनं हळद दूध बनवा, तब्येतीसाठी अमृत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:20 IST2025-12-04T15:04:34+5:302025-12-04T16:20:34+5:30
Right Way to Make Turmeric Milk :

स्वयंपाकात हळदीचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे पण आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत लोकांकडे वेळ खूपच कमी असतो ज्यामुळे लोक हळदीचा आहारात समावेश करण्यासाठी रोज रात्री हळदीचं दूध पितात. (Right Way to Make Turmeric Milk)

या दुधाच्या गुणकारी फायद्यांमुळे त्याला गोल्डन मिल्क असं म्हणतात. गोल्डन मिल्क तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. (How To Make Turmeric Milk)

हळदीच्या दुधात काय काय घालावं?
एक कप गाईचे दूध गरम करून त्यात २ ते ३ चिमूट हळद पावडर, १ चुटकी काळी मिरी पावडर, १ चुटकी जायफळ पावडर, एक चुटकी दालचिनी पावडर, १ चमचा साजूक तूप, चवीनुसार गूळ घालून व्यवस्थित उकळवून घ्या. साधारण ५ ते ७ मिनिटं मध्यम आचेवर हे दूध उकळल्यानंतर गॅस बंद करा.

हळदीचं दूध पिण्याचे फायदे
हळदीतील करक्यूमिन, काळी मिरीतील पेपरीनसोबत मिसळल्यास एंटी ऑक्सिडेंट्सचा प्रभाव वाढतो. दालचिनी आणि जायफळाचे एंटी इन्फ्लेमेटरी गुण शरीराची सूज कमी करतात.

साजूक तूप आणि हळद पाचक एंजाईम्सना सक्रीय करतात ज्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.

रात्री झोपण्याआधी हळदीचं दूध प्यायल्यानं मेलेटोनिचं उत्पादनं वाढतं आणि झोपेची गुणवत्ता चांगली होते.नियमित याचे सेवन केल्यास ब्लड प्रेशर कंट्रोल होते आणि कोलेस्टेरॉलही वाढत नाही.

















