थंडीत हळदीचं दूध घेताय? हळद दूध बनवण्याची योग्य पद्धत पाहा; खोकला-सर्दी दूर होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 17:20 IST2025-11-16T17:08:27+5:302025-11-16T17:20:59+5:30
Right Way to Make Turmeric Milk : दूध गाळून झाल्यावर कोमट असताना चवीनुसार गूळ किंवा मध मिसळा.

थंडीच्या दिवसांत हळदीचं दूध (Turmeric Milk) बरेच जण घेतात. याला गोल्डन मिल्क असं म्हणतात हळदीच्या दुधानं इम्युनिटी वाढते, खोकल्यापासून आराम मिळण्यासही मदत होते. (Right Way to Make Turmeric Milk)

हळदीचं दूध बनवण्यासाठी १ कप गाईचं दूध किंवा नारळाचं दूध, बदामाचं दूध घ्या. अर्धा ते १ चमचा सेंद्रीय आणि चांगल्या प्रतीची हळद वापरा.

हळदीसोबत चिमूटभर काळी मिरी पूड घाला. मिरीमुळे हळदीतील कर्क्युमिनचे शरीरात शोषण वाढते.

या दूधात दीड चमचा साजूक तूप किंवा नारळाचे तेल घाला. यामुळे अधिकाधिक फायदे मिळतील.

चवीसाठी आणि अधिक फायद्यांसाठी दालचिनी किंवा सुंठ चिमूटभर वापरू शकता.

हे सर्व मिश्रण एका भांड्यात घेऊन मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटं उकळू द्या.जेणएकरून मसाले दुधात व्यवस्थित मिसळतील.

दूध गाळून झाल्यावर कोमट असताना चवीनुसार गूळ किंवा मध मिसळा.

हळदीच्या दुधाचे उत्तम फायदे मिळवण्यासाठी ते रात्री झोपण्याआधी प्या.

















