Raksha Bandhan 2025: भावाच्या हातावर बांधण्यासाठी पाहा राखीचे ६ सुंदर प्रकार, रेशमाच्या धाग्यात नटलेलं प्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 17:08 IST2025-08-07T17:02:22+5:302025-08-07T17:08:43+5:30
Raksha Bandhan 2025: See 6 beautiful types of Rakhi Designs , special Rakhi for special bond : रक्षा बंधनासाठी खास राखी. पाहा किती सुंदर प्रकार आहेत.

रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण. दादाकडून काहीतरी छान भेटवस्तू घ्यायची आणि त्याच्या हातावर छान सुंदर राखी बांधून आयुष्यभर माझ्यापाठीशी उभा राहा. माझी रक्षा कर असे अप्रत्यक्षपणे सांगणे दादाला सांगायचे.
दादासाठी छान सुंदर अशी राखी घ्यायला तर हवीच. ही राखी फक्त एक दोरा नसून नात्याचे प्रतिक आहे. त्यामुळे छान सुंदर राखीच हवी.
लहान मुलांसाठी छान कार्टूनचे फोटो असणाऱ्या राख्या आजकाल फार लोकप्रिय आहेत. आवडत्या पात्राला राखीवर पाहून लहान मुलांना फार आनंद होतो. त्यामुळे जर भाऊ लहान असेल तर अशी राखी नक्कीच घ्या.
दुसरी फार मागणीत असलेली राखी म्हणजे ओम , श्री असे शब्द लिहिलेल्या राख्या. त्यांचा रंग आणि डिझाइन फार सुंदर दिसते. कोणत्याही वयाच्या माणसाला बांधू शकता.
लहान मुलांसाठी आणखी एक छान प्रकार म्हणजे बटणाची राखी. त्यावर लाईट बसवलेले असतात. राखीच्या मधोमध बटण असते ते दाबल्यावर लाईट लागतात. लहान मुलांना त्याची गंमत वाटते.
घरी गोंड्याची राखी करता येते. अगदी सोपी आहे. लहान मुलींना अशा राखी तयार करुन दादाच्या हातावर बांधायला फार मज्जा वाटते. त्यामुळे जर बहीण लहान असेल तर तिला अशी राखी तयार करायला नक्की शिकवा.
रंगीबेरंगी राखी बाजारात मिळते. विविध रंगाचे दोरे एकत्र करुन ही राखी तयार करतात. एकदम सुंदर दिसते. शाळेत तसेच कॉलेजात जाणाऱ्या भावाच्या हातावर एकदम सुंदर दिसले.
मोती , मणी ओवलेली राखी मिळते. फार सुंदर दिसते. रंगीत मोती, समरंगाचे मोती सारे प्रकार यात असतात. नक्कीच घ्यायला हरकत नाही. फार छान पॅटर्न आहे.