Guru Purnima 2025 Prasad: प्रसादाचा शिरा करताना ५ पदार्थ आठवणीने घाला! शिरा होईल एकदम परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2025 16:35 IST2025-07-09T15:55:54+5:302025-07-09T16:35:00+5:30

Guru Purnima 2025 Prasad Recipes, Sheera Recipes in Marathi, Suji Halva Recipes in Marathi,

गुरुपौर्णिमेनिमित्त (Guru Pournima 2025) बहुतांश घरांमध्ये नैवेद्यासाठी साजुक तुपातला शिरा केला जातो. अगदी सत्यनारायणाच्या दिवशी करतात तशा पद्धतीचा हा शिरा असतो.(how to make sheera or suji halva more delicious)

शिऱ्याची रेसिपी सगळीकडे सारखीच असली तरी काही घरांमध्ये मात्र शिरा करताना त्यात काही खास पदार्थ घातले जातात आणि त्यामुळे तिथला शिरा जास्त चवदार होतो.(simple tips for making sheera or suji halva more tasty)

ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा आणि यंदा नैवेद्यासाठी शिरा करताना तेच पदार्थ शिऱ्यामध्ये घालून पाहा.. बघा चवीमध्ये नेमका काय फरक जाणवतो...

सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे वेलची पूड. काही जण शिऱ्यात नुसती वेलची घालतात. त्याने सुगंध येत नाही. वेलची पूड अगदी आयत्यावेळी करा आणि मग ती शिऱ्यामध्ये घाला. खूप छान सुगंध येईल.

जायफळाची पावडरही शिऱ्यामध्ये आठवणीने घाला. त्यामुळेही शिऱ्याला वेगळाच हलकासा सुगंध येतो..

शिऱ्यामध्ये केशर आवर्जून घालायला हवं. कारण केशर घातल्याने त्याचा सुगंध तर खुलतोच पण शिऱ्याला रंगही खूप छान येतो.

चौथा पदार्थ म्हणजे सुकामेवा. सुकामेवा शिरा झाल्यानंतर त्यावर नुसताच वरून घालू नका. तर तो आधी तुपामध्ये खमंग तळून घ्या आणि नंतर तो शिऱ्यामध्ये घाला. तुपात तळल्यामुळे सुकामेव्याचाही स्वाद खुलेल.

नैवेद्याचा शिरा करताना तो साजूक तुपातच केला जातो. पण शिरा झाल्यानंतर तुम्ही जेव्हा गॅस बंद करता तेव्हाही त्यावर वरून एक ते दोन चमचे तूप सोडा. वरण भातावर आपण जसं तूप घेतो, त्याच पद्धतीने जेव्हा आपण शिऱ्यावर तूप घालतो तेव्हा त्याची चव आणखी छान लागते. एकदा ट्राय करून पाहा.