शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मौनी रॉय फिट राहण्यासाठी करते योगसाधना, पाहा फोटो - कमालीचा फिटनेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2023 6:36 PM

1 / 8
'नागीण' फेम मौनी रॉयने अल्पवधीतच प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. तिने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिचा हॉट आणि बोल्ड लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो.
2 / 8
मौनी आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती स्वतःला मेन्टेन ठेवण्यासाठी योग यासह डान्स करते. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर योग करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 8
अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होतात. ती आपल्या न्यू प्रोजेक्ट यासह फोटोशूटचे फोटो शेअर करते. तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.
4 / 8
अभिनेत्री मौनी रॉयची फिगर सर्वांना आकर्षित करते. तिचा फिटनेस पाहून प्रत्येक स्त्रीला अशी फिगर मिळावी अशी इच्छा होते.
5 / 8
मौनी तिच्या परफेक्ट फिगरसाठी खूप मेहनत घेते. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना तिने सांगितले की, ती फिटनेस मेन्टेन ठेवण्यासाठी योगाची कशी मदत घेते.
6 / 8
नियमित योगा केल्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडले. योगासने केल्याने मन शांत राहते. तसेच शरीर तंदुरुस्त राहते. मौनी रॉयसारखी फिगर बनवण्यासाठी आपण देखील योगाचे टिप्स फॉलो करू शकता.
7 / 8
अभिनेत्री सूर्यक्रिया, अष्टांग योग, हठयोग इत्यादींचाही सराव करते. अशाप्रकारे, तुम्हीही हा योग करून मौनी रॉयसारखी परफेक्ट फिगर मिळवू शकता.
8 / 8
मौनी नुकतीच ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसून आली होती. तिच्या पाईपलाईनमध्ये सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
टॅग्स :Mouni Royमौनी राॅयFitness Tipsफिटनेस टिप्स