International Yoga Day 2025: शिल्पा शेट्टी ते आलिया भट, ६ अभिनेत्रींचं योगामुळे जगणंच बदललं कायमचं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 15:11 IST2025-06-18T18:00:00+5:302025-06-19T15:11:36+5:30
International Yoga Day 2025 celebrities : celebrity yoga transformation stories: योग हा आपल्या शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.२१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो.

योग हा आपल्या शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.२१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. (International Yoga Day 2025 celebrities)
बॉलिवूडमधल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमितपणे योगा करतात. या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया. (celebrity yoga transformation stories)
फिटनेसच्या बाबतीत शिल्पा शेट्टीचे नाव पहिल्या यादीत आहे. तिने आपल्या फिटनेसबाबत अनेकदा सोशल मीडियावर मत मांडले आहे. योगा करुन ती वयाच्या पन्नाशीतही फिट आहे. फेस योगापासून विविध योगा ती चाहत्यांसोबत शेअर करते.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फिटनेसबद्दल ती नेहमी चाहत्यांना सांगते. नियमितपणे योगा करुन वाढत्या वयात देखील ती फिट आहे.
अभिनेत्री करीना कपूर देखील तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. प्रेग्नेंसीमध्ये तिचे वजन खूप वाढले होते, योगाच्या मदतीने तिने पुन्हा एकदा आपले वजन कमी केले.
आलिया भट सुद्धा फिटनेस फ्रीक आहे. तिच्या दैनंदिन जीवनशैलीतून ती रोज योगा करते. तसेच सोशल मीडियावर याबबात पोस्टही करत असते.
टिव्ही सीरियलमधून घराघरांमध्ये पोहचलेली मौनी रॉय ही देखील वारंवार आपल्या फिटनेस रुटीन बाबत सांगत असते. योगामुळे शरीराला अनेक फायदे होतात तसेच स्ट्रेस देखील कमी होतो.