पुऱ्या-भजी तळून उरलेलं तेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरावं का? त्या तेलाचं काय करायचं..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:36 IST2026-02-17T20:22:54+5:302026-02-18T13:36:11+5:30
How to Reuse Oil Once Used For Frying : वारंवार तापवलेल्या तेलात ट्रान्स फॅट्स तयार होतात. जे हृदयासाठी घातक ठरू शकतात.

तळण्यासाठी एकदा वापरलेलं तेल पुन्हा वेगळ्या पदार्थांसाठी वापरणं तब्येतीसाठी योग्य नाही.

तेल पूर्णपणे थंड होऊ द्या
तळून झाल्यानंतर तेल लगेच दुसऱ्या डब्यात भरण्याची घाऊ करू नका. तेल पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहा. (How To Reuse Oil That Used For Frying)

वापरलेल्या तेलाच अन्नाचे बारीक कण शिल्लक राहतात. त्यामुळे बारीक गाळणीनं किंवा सुती कापडानं तेल गाळून घ्या. जेणेकरून जळलेले कण निघून जाण्यास मदत होईल.

गाळतेलं तेल काचेच्या बरणीत किंवा स्टिलच्या डब्यात भरून ठेवा. ते उजेडापासून लांब ठेवा. थंड किंवा कोरड्या ठिकाणी ठेवा.

तळलेलं तेल पुन्हा भाजी पदार्थासाठी वापरणं योग्य नाही.

जुनं वापरलेलं तेल आणि ताजं तेल कधीच एकत्र करू नये. यामुळे ताज्या तेलाची गुणवत्ता खराब होते.

हे तेल पुन्हा तळण्यासाठी न वापरता फोडणीसाठी भाजीसाठी किंवा पराठे भाजण्यासाठी वापरू नये. तळलेलं तेल खाणं योग्य नाही. ते दिवे लावणे, पणत्या यासाठी वापरणं ठीक.

जर तुम्ही पुरी किंवा भजी तळली असतील तर तेलाचा रंग बदलतो, त्यामुळे पदार्थांचाही रंग बदलेल. वासही वेगळा येतो.

















