शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सुटलेलं बेडौल शरीर म्हणजे चरबीचं घर, पाहा १० टिप्स-फॅटलॉस करा झरझर, पाहा स्वत:तला बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:54 IST

1 / 10
शरीरातील अतिरिक्त चरबी (Body Fat) कमी करण्यासाठी कोणताही एक जादूई उपाय नसला तरी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हे चरबीचे सर्वात मोठे शत्रू मानले जातात. (How To Reduce Body Fat)
2 / 10
पालेभाज्या, कडधान्य आणि फळं, भरपूर फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ पचायला वेळ घेतात. ज्यामुळे तुम्हाला बराचवेळ भूक लागत नाही आणि शरीरात अतिरक्त चरबीही जमा होत नाही. (10 Tips to Reduce Fat Loss Quickly)
3 / 10
साखर आणि गोड पदार्थ रक्तातील इन्सुलिन वाढवात. ज्यामुळे शरीर चरबी साठवू लागते. साखरेचे प्रमाण कमी करणं हा चरबी घटवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
4 / 10
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी आणि लिंबू घेतल्यान शरीरातील मेटाबॉलिझम वाढते. जे चरबी जाळण्यास मदत करते.
5 / 10
आहारात डाळी, अंडी किंवा पनीर यांसारख्या प्रथिनांचा समावेश केल्यानं स्नायू वाढतात आणि चरबी कमी होते.
6 / 10
यामध्ये असलेले एंटी ऑक्सिडेंट्स शरीरातील अनावश्यक फॅट्स विरघळवण्यास मदत करतात.
7 / 10
पॅकेटमधील पदार्थ, मैदा आणि जंक फूड हे चरबीचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांचा त्याग करणं म्हणजेच चरबीवर विजय मिळवणं होय.
8 / 10
रात्री झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी हलकं जेवण घेतल्यास अन्नाचे रुपांतर चरबीत होत नाही.
9 / 10
दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुधारते.
10 / 10
चरबी कमी करण्यासाठी कॅलरी काऊंट ठेवा तसंच पोटाची अतिरिक्त चरबी वाढणार नाही यासाठी शरीर फिजिकली एक्टिव्ह ठेवा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स