शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

साप अंथरुणात शिरण्याची भिती वाटते? 7 गोष्टी करा, उन्हाळ्यात सापांचा टळेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:26 IST

1 / 10
उन्हाळ्याच्या दिवसांत थंड जागा शोधण्यासाठी किंवा अन्नाच्या शोधात साप घरात शिरण्याची शक्यता असते. सुरक्षिततेसाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय करू शकता ज्यामुळे तुम्हाला सुरक्षित राहता येईल. (How To Keep Snakes Away From Your Home)
2 / 10
घराच्या आजूबाजूला पालापाचोळा, लाकडांचे ढीग किंवा कचरा साचू देऊ नका. कारण अशा ठिकाणी साप लपून बसतात.
3 / 10
घराच्या भिंतींना असलेल्या भेगा, ड्रेनेज पाईपच्या कडा किंवा दरवाज्याचाखालच्या फटी सिमेंटने किंवा जाळी लावून व्यवस्थित बंद करा.
4 / 10
सापांचे मुख्य खाद्य उंदीर आहे. घरात किंवा आवारात उंदीर होणार नाहीत. याची काळजी घेतल्यास साप तिथे येत नाहीत.
5 / 10
घराभोवती मोठी झाडं किंवा गवत वाढले असेल तर त्याची नियमित छाटणी करा. जेणेकरून सापांना लपायला जागा मिळणार नाही.
6 / 10
सापांना उग्र वास आवडत नाही. घराच्या प्रवेशद्वारापाशी लसूण पाण्याचा फवारा किंवा कडुलिंबाचा पाला जाळल्यास साप लांब राहण्यास मदत होते.
7 / 10
तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घराच्या बाहेरील भिंतींच्या कडेनं कार्बोलिक एसिडच्या काही थेंबांचा वापर करा. याच्या उग्र वासानं साप जवळ येत नाहीत.
8 / 10
उन्हाळ्यात साप पाण्यात शोधात येतात. त्यामुळे घराच्या भिंतींना लागून पाणी साचणार नाही किंवा नळ गळणार नाहीत याची दक्षता घ्या.
9 / 10
रात्रीच्यावेळी घराच्या आवारात पुरेसा उजेड ठेवा.अंधार ठेवल्यास सापांचा वावर वाढतो त्यामुळे उजेड असल्यास साप लांब राहतात.
10 / 10
साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी त्वरीत सर्प मित्रांशी संपर्क साधून सापांना बाहेर काढणं कधीही सुरक्षित ठरते.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाsnakeसापHomeसुंदर गृहनियोजनHome remedyहोम रेमेडीSummer Specialसमर स्पेशल