शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हामुळे गळून गेल्यासारखं होतं? खा दह्याचे ५ पदार्थ- पोटाला मिळेल थंडावा आणि येईल झटपट तरतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2024 11:52 AM

1 / 9
उन्हाचा पारा एवढा वाढला आहे की हल्ली बऱ्याच जणांना त्यामुळे डिहायड्रेशन होऊन खूप गळून गेल्यासारखं होतं.
2 / 9
त्यामुळे आहारतज्ज्ञांच्या मते या दिवसांत शरीर थंड ठेवण्यासाठी काही पदार्थ आवर्जून खाल्लेच पाहिजेत. त्यापैकी एक पदार्थ आहे दही.
3 / 9
सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यामते रोज दुपारच्या जेवणात दही किंवा ताक असं काहीतरी घ्या. जेणेकरून अंगातली उष्णता कमी होण्यास मदत होईल. दही किंवा ताक असं नुसतंच खायला किंवा प्यायला आवडत नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून घेऊ शकता. पुढे दिलेले दह्याचे काही पदार्थ अधूनमधून खाल्ले तरी उष्णतेचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल..
4 / 9
दही, ताक आवडत नसेल तर लस्सी पिऊ शकता... थंडगार लस्सीदेखील मन आणि शरीर या दोन्हींना गारवा देणारी आहे.
5 / 9
दही भात हा या दिवसांतला एक उत्तम पदार्थ आहे. दुपारच्या जेवणात दही भात आवर्जून खा.
6 / 9
दहीपोहे हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांत नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहे. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
7 / 9
उन्हाळ्यात अधूनमधून थंडगार दहीवडे खायलाही हरकत नाही. वडे तळल्यानंतर काही सेकंदांसाठी पाण्यात टाकून हलक्या हाताने दाबून घ्या. यामुळे वड्यांमधलं जास्तीचं तेल निघून जाईल.
8 / 9
दही टाकून केलेल्या वेगवेगळ्या कोशिंबीरी उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात घ्यायलाच पाहिजेत. यामध्ये काकडीची कोशिंबीर किंवा काकडीचे रायते असेल तर अधिक उत्तम. कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते.
9 / 9
दही बुंदी किंवा बुंदीचं दही घालून केलेलं रायतं हा पदार्थही या दिवसांत खा. दह्यामुळे अंगातली उष्णता कमी होते.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सSummer Specialसमर स्पेशलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHeat Strokeउष्माघात