परीक्षेच्या आधी मुलांना खाऊ घाला ५ पदार्थ, एकाग्रता वाढेल आणि पाठ केलेलं आठवेल भरभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2023 18:13 IST2023-10-02T18:02:07+5:302023-10-02T18:13:07+5:30

काही मुलं भरपूर अभ्यास करतात. पण परीक्षेत नेमकं आठवतच नाही. किंवा काय लिहायचं सुचतच नाही. त्यामुळे मग सगळं येऊन- अभ्यास करूनही मार्क कमी पडतात.
असं तुमच्याही मुलांच्या बाबतीत होत असेल तर परीक्षेच्या आधी त्यांना कोणते पदार्थ खायला द्यावेत, याविषयी डॉ. नंदिता चक्रवर्ती यांनी टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपला दिलेली ही माहिती एकदा वाचा.
शरीराचा आणि मेंदूचा खूप जवळचा संबंध असतो. शरीर निरोगी असेल तर मेंदूही अधिक तल्लखपणे काम करतो. म्हणूनच मुलांच्या खाण्या-पिण्याकडे आणि विशेषत: परिक्षेदरम्यान जरा जास्त बारकाईने लक्ष द्या, असं त्या सांगतात.
डॉक्टर म्हणतात की अक्रोड, जवस असे ओमेगा ३ फॅटी ऍसिड असणारे पदार्थ मुलांचा मेंदू तल्लख ठेवतात. त्यामुळे परिक्षेपुर्वी त्यांना ते आवर्जून द्या.
ब्राऊन राईस, ओट्स या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समुळे मेंदूला एनर्जी मिळते.
बीन्स, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामुळे मेंदूचा अलर्टनेस आणि एकाग्रता वाढते,
परीक्षेच्या आधी नाश्ता करताना त्यामध्ये मुलांना एक फळ नक्की द्या. कारण फळांमध्ये असणाऱ्या ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे मेंदू अधिक सक्षमपणे काम करतो.
त्याचबरोबर शरीराला आणि मनाला आलेला थकवा दूर करण्यासाठी पाणी खूप गरजेचे आहे. म्हणून मुलांना परीक्षेच्यादरम्यान वारंवार पाणी प्यायला सांगा. लिंबू सरबत किंवा हर्बल टी देखील तुम्ही देऊ शकता.