तरुणी आणि महिलांमध्ये दिसतात फॅटी लिव्हरची 'ही' लक्षणं, दारु पिण्याचा संबंध नाही पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:43 IST2025-04-02T11:35:23+5:302025-04-03T18:43:16+5:30

Fatty Liver Sign : केवळ पुरूषच नाही तर महिलांमध्ये सुद्धा ही समस्या वाढली आहे. पण अनेकांना ही समस्या झाल्याचं समजत नाही किंवा याची लक्षणं माहीत नसतात.

Fatty Liver Sign : सामान्यपणे अनेकांना असं वाटतं की, फॅटी लिव्हरची समस्या केवळ दारू पिणाऱ्या लोकांनाच होते. पण असं अजिबात काही नाहीये. कारण दारू न पिताही तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. फॅटी लिव्हरची समस्या आजकाल खूप वाढली आहे. केवळ पुरूषच नाही तर महिलांमध्ये सुद्धा ही समस्या वाढली आहे. पण अनेकांना ही समस्या झाल्याचं समजत नाही किंवा याची लक्षणं माहीत नसतात.

लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये झालेल्या बदलामुळे व तसेच वाढत्या स्ट्रेसमुळे फॅटी लिव्हरची समस्या अधिक वाढत आहे. पण सगळ्यात मोठी समस्या आहे याची लक्षणं माहीत नसणं. जर याची लक्षणं माहीत असतील तर वेळीच योग्य ते उपचार करता येतील. अशात तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या आहे की नाही हे तुम्ही घरच्या घरी चेक करू शकता.

देशातील लिव्हरचे प्रसिद्ध डॉक्टर आरके सरीन यांनी अलिकडे द लल्लन टॉप वेबसाईटला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी ही समस्या घरीच कशी ओळखायची याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी 5 अशा गोष्टी सांगितल्या ज्याद्वारे तुम्ही फॅटी लिव्हरच्या समस्येची माहिती घेऊ शकता.

डॉक्टर सरीन यांनी वजनाचा एक फॉर्मूला सांगितला. ज्याद्वारे तुम्हाला फॅटी लिव्हर आहे की नाही हे माहीत पडतं. जर एखाद्या तरूणाची उंची 170 सेंटीमीटर असेल तर त्यातील 1 काढून टाका, ज्यामुळे बाकी राहतील फक्त 70. जर त्याचं वजन 70 पेक्षा जास्त असेल तर त्याला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते.

तरूणींसाठी हेच प्रमाण वेगळं ठरतं. डॉक्टर म्हणाले की, जर एखाद्या तरूणीची उंची 156 सेंटीमीटर असेल तर त्यातून 105 मायनस करा. जो नंबर येईल त्यापेक्षा जर तिचं वजन जास्त असेल तर तिला हा फॅटी लिव्हरचा संकेत असू शकतो.

महिलांसाठी डॉक्टरांनी सांगितलं की, जर कुणाच्या हिप आणि वेस्टचा रेशिओ 0.7 पेक्षा जास्त असेल, तर त्यांना फॅटी लिव्हरची समस्या असू शकते.

फॅटी लिव्हर असल्याचा संकेत देणारी आणखी बाब म्हणजे मानेवरील जाडपणा. जर एखाद्या महिलेची मान 37 सेंटीमीटरपेक्षा जाड असेल तर त्याचं लिव्हर फॅटी असू शकतं.

डॉक्टर म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीच्या परिवारात आई-वडील किंवा आजी-आजोबांना बीपी, डायबिटीस, हार्ट डिजीज, कोलेस्टेरॉल, कॅन्सर, किडनी डिजीज व स्ट्रोकची समस्या राहिली असेल तर त्यांना फॅटी लिव्हरचा धोका अधिक असतो.