Diet recipes : कोण म्हणतं डाएट बोअरिंग असतं? पाहा ६ रेसिपी, चविष्ट पदार्थ खाऊन घटवा वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2025 10:13 IST2025-10-23T10:10:11+5:302025-10-23T10:13:21+5:30

Diet recipes: Who says diet is boring? Check out these 6 recipes, lose weight by eating delicious foods : आयोरग्यासाठीही चांगले तसेच चवेला उत्तम. करा हे सोपे पदार्थ.

वजन कमी करण्याची जर्नी अजिबात सोपी नसते. त्यात जर तुम्ही खवय्या असाल तर वजन कमी करणे आणखी कठीण होते. मात्र काही असेही पदार्थ असतात जे तुम्ही डाएट करताना बिनधास्त खाऊ शकता. त्यामुळे वजन वाढत नाही आणि पोषणही मिळते.

सॅलेड म्हटले की आपण त्याला चवहीनच समजतो. मात्र तसे नसून सॅलेड फार चविष्टही असू शकते. जसे की हे सोयाबिनचे सॅलेड. छान परतून कुरकुरीत केलेले तेही अगदीच बेसिक मसाल्यांवर. त्यात आवडत्या भाज्या आणि थोडे चीज घाला.

मखाण्याचा चिवडा पचायला अगदीच हलका असतो. तसेच अगदी चमचाभर तुपावर परतला तरी छान खमंग आणि कुरकुरीत होतो. त्यात खोबरं, शेंगदाणे, कडीपत्ता आणि काजू घाला. लाल तिखटावर परतून घ्या.

ब्राऊन राईस वजन कमी करताना खाल्ला जातो. चवीला भातासारखाच असतो. तसेच त्यासोबत पनीर परतून घेऊ शकता. त्यासोबत भाज्याही परतून घ्या.

ब्रोकोली बोअरींग वाटते? मग मुळात तसे अजिबात नसून एकदा ही अशी ब्रोकोली खाऊन पाहा. व्हाइट सॉसमध्ये शिजवलेली ब्रोकोली घालायची. व्हाइट सॉससाठी मैदा न वापरता तांदळाचे पीठ घ्यायचे.

टोमॅटो आमलेट हा एक चविष्ट नाश्त्यासाठी प्रकार आहे. अगदी कमी तेलावरही खमंग असे टोमॅटो आमलेट करता येते. नक्की करा. त्यात हिरवी मिरची, कांदा घालून चव वाढवता येते.

सोयाबिनचे कबाब करता येतात. अगदी सोपे असतात. त्यात बीटाचा रस घाला म्हणजे चव आणि रंग दोन्ही छान येते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. परतण्यासाठी तेला ऐवजी तूप वापरा. तुपात हेल्दी फॅट्स असतात.