Deep Amavasya 2025: पाहा दिव्यांच्या रांगोळीचे ७ सोपे डिझाइन्स- दिव्याची आवस उजळेल लख्ख प्रकाशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 16:04 IST2025-07-22T11:26:50+5:302025-07-23T16:04:41+5:30

Deep Amavasya Special Rangoli Designs: Simple, Easy & Beautiful Deep Amavasya Rangoli Designs

आषाढ महिना संपून आता श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. या दिवशी घरातले सगळे दिवे घासून- पुसून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पुजा केली जाते.

म्हणूनच या दिवशी घरासमोरची रांगोळीही दिव्यांचं मांगल्य आणि पावित्र्य यांचं महत्त्व सांगणारी असावी. आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दिवा लावून होते. त्यामुळेच दीप अमावस्येच्या दिवसाची सुरुवातही अशा पद्धतीने दिव्यांची सुबक रांगोळी काढून करायला हरकत नाही.

दीप अमावस्येला काढण्यासाठी ही एक साधी सोपी आणि सुटसुटीत रांगोळी पाहा.. मधोमध गणपती ठेवल्यामुळे रांगोळी अधिक आकर्षक झाली आहे.

अशा पद्धतीची रांगोळी काढून तुम्ही तिच्या मधोमध दिवा ठेवला तरी रांगोळी आणखीनच खुलून येईल.

ही रांगोळी दिसायला अतिशय आकर्षक दिसते आणि विशेष म्हणजे ती खूप लवकर काढून होते. मधोमध दिवा ठेवला तर ती अधिक छान दिसू शकते.

अशा पद्धतीची समई काढली तर तुमची रांगोळी नक्कीच इतरांपेक्षा वेगळी दिसेल. बारकाईने पाहिलं तर ही रांगोळीही अगदी सहज काढता येण्यासारखी आहे.

मोराची समई काढण्याची ही एक सोपी पद्धत पाहा. अशा समई तुम्ही तुमच्या घराच्या दोन्ही बाजुला काढू शकता. त्यावर खरेखुरे दोन दिवे ठेवले की घराचं प्रवेशद्वार पाहा कसं प्रसन्न, आनंदी वाटू लागेल.

कमीतकमी वेळेत काढून होण्यासारखी ही एक सुंदर रांगोळी पाहा. झटपट होईल आणि दिसेलही आकर्षक, सुंदर.