ताटात चटणी असेल तर वाढते जेवणाची रंगत! अस्सल महाराष्ट्रीयन चवीच्या पाहा ६ चटण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 17:55 IST2025-04-25T17:51:15+5:302025-04-25T17:55:46+5:30
Chutney enhances the flavor of the food! Check out these 6 chutneys with authentic Maharashtrian flavor : जेवताना तसेच नाश्त्याला चटणी असली की मज्जाच येते. पाहा किती प्रकार असतात चटणीचे.

जेवताना ताटामध्ये विविध चवींचे पदार्थ असले की जेवायला मस्त मज्जा येते. एका बाजूला पोळी भाजी आणि दुसर्या बाजूला लोणचे, ठेचा, चटणी, पापड असे प्रकार असले की ताट छान भरल्या सारखे वाटते.
चटणी हा पदार्थ आपण वरचेवर करतोच. चटणी हे फार लोकप्रिय असे तोंडीलावणे आहे. करायलाही फार वेळ लागत नाही. अगदी झटपट करता येते.
पण नेहमी एकाच चवीची चटणी खाण्यात काही मज्जा नाही. त्यामध्ये काही तरी नाविन्य असायला हवे. विविध प्रकारच्या चटण्या करता येतात. सगळ्याच अगदी झटपट होतात.
महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच ही नारळाची चटणी केली जाते. सणासुदीला तसेच लग्न समारंभांमध्येही ही नारळ कोथिंबीरीची चटणी केली जाते.
दाण्यांची सुकी चटणी केली जाते आणि ओली चटणीही करतात. या चटणीला मस्त कडीपत्याचा तडका दिल्यावर तिची चव दुप्पट होते. त्यामध्ये छान गोड दही घाला.
तुम्ही कधी पोहे घालून चटणी केली आहे का? डाळं, कोथिंबीर, पोहे, हिरवी मिरची, नारळ यांच्या मिश्रणातून केलेली ही चटणी अगदीच चविष्ट लागते.
कच्च्या कांद्याची चटाकेदार चटणी नक्की खाऊन बघा. करायला अगदीच सोपी असते. तसेच पोळीबरोबर फक्त ही चटणी असली तर मग भाजीचीही गरज नाही.
टोमॅटोची चटणी तर सगळ्याच पदार्थांसोबत खाता येते. मस्त झणझणीत अशी ही चटणी फार लोकप्रियही आहे. काश्मीरी लाल मिरची घालून केलेली ही लालचुटूक चटणी इडली, डोसा तसेच वड्याबरोबर मस्त लागते.
सध्या कैरीचा सिझन सुरू आहे. कैरीचे विविध पदार्थ तुम्ही खात असला. कैरीची चटणीही खाऊन बघा. करायला सोपी असते तसेच मस्ता आंबट गोड लागते.