जास्त वर्ष जगणाऱ्या माणसांचं काय असतं सिक्रेट? ठणठणीत तब्येत आणि नितळ त्वचेसाठी सोपे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:11 IST2026-02-24T20:15:50+5:302026-02-26T19:11:33+5:30
Back To Basics Exploring The Habits Of Our Long Lived Ancestors : साखरेऐवजी गुळाचा वापर आणि घाण्याचे शुद्ध तेल मर्यादीत प्रमाणात वापरल्यामुळे त्यांना मधुमेह आणि हृदयविकारासारखे लाईफस्टाईल डिसीज कमी व्हायचे

पूर्वीच्या लोकांचे दीर्घायुष्य आणि १०० वर्षांपर्यंत जगण्यामागे त्यांची नैसर्गिक आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे मुख्य कारण आहे. (Back To Basics Exploring The Habits Of Our Long Lived Ancestors)

शुद्ध आणि नैसर्गिक आहार
पूर्वीचे लोक शेतात पिकलेले ताजे, ऋतूंनुसार मिळणारे आणि रासायनिक खतांविरहीत अन्न खात असत. आहारात बाजरी, ज्वारी, नाचणी यांसारख्या भरड धान्यांचा समावेश अधिक असायचा.

कष्टकरी जीवन
त्याकाळी आजच्यासारखी प्रगत तंत्र नसल्यामुळे शेतीचं कामं, पाणी भरणं किंवा प्रवासासाठी चालणं यामुळे शरीराचा भरपूर व्यायाम होत असे. ज्यामुळे हृदय आणि स्नायू मजबूत राहायचे.

लवकर निजे लवकर उठे या नियमांचे ते पालन करायचे. सुर्योद्याला उठणं आणि सुर्यास्तानंतर लगेच जेवून लवकर झोपल्यामुळे त्यांच्या शरीराचे नैसर्गिक चक्र उत्तम काम करायचे.

सध्याच्या तुलनेत पूर्वी धावपळ आणि स्पर्धा कमी होती. एकत्र कुटूंब पद्धतींमुळे मानसिक आधार मिळायचा. परिणामी तणाव आणि चिंता कमी असायची.

किरकोळ आजारांवर ते घरगुती काढे, वनस्पती आणि आयुर्वेदाचा आधार घेत असतं. रासायनिक औषधांचा मारा नसल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती उपजतच चांगली असायची.

साखरेऐवजी गुळाचा वापर आणि घाण्याचे शुद्ध तेल मर्यादीत प्रमाणात वापरल्यामुळे त्यांना मधुमेह आणि हृदयविकारासारखे लाईफस्टाईल डिसीज कमी व्हायचे.

शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी यामुळे श्वसनाचे आणि पोटाचे विकार त्यांना सहसा होत नसत. सण वारांच्या निमित्तानं केलेले जाणारे उपवास शरीराला डिटॉक्स करायचे. ज्यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळायची..

















