डिप्रेशन तुम्हाला घेरत तर नाही, ८ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष-वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 19:31 IST2026-03-09T16:01:59+5:302026-03-09T19:31:00+5:30

8 Signs Of Depression : कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यास त्रास होणं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं किंवा साध्या गोष्टींतही लक्ष न लागणं.

डिप्रेशन ही केवळ तात्पुरती स्थिती नसून ही एक गंभीर मानसिक स्थिती आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही खालील ८ लक्षणांपैकी बहुतांश लक्षणं सतत २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसत असतील तर त्याकडे गांभीर्यानं पाहायला हवं. (8 Signs Of Depression)

दिवसभर आणि सतत मन उदास राहणं, विनाकारण रडू येणं किंवा आतून शून्य किंवा रिक्त वाटणं हे डिप्रेशनचे मुख्य लक्षण आहे. (How Do You Know If You Suffer From Depression)

ज्या गोष्टींमुळे पूर्वी आनंद मिळायचा उदा. छंद जोपासणं, मित्रमैत्रिणींना भेटणं, खेळणं त्या गोष्टी आता नकोशा वाटतात किंवा त्यातून आनंद मिळणं बंद होतं.

झोप नीट लागत नाही दिवसभर विचार येत असतात.रात्री वारंवार जाग येते.

अचानक भूक मंदावणे किंवा वजन कमी होणे किंवा काही प्रकरणांमध्ये खूप जास्त भूक लागणं आणि वजन झपाट्यानं वाढणे.

शारीरिक कष्ट न करताही थकल्यासारखं वाटणं, साधी छोटी कामं करण्यासाठीही खूपच ऊर्जा लागते असं वाटणं.

सतत स्वत:ला दोष देणं, आपणच कुचकामी आहोत असं वाटणं किवा विनाकारण अपराधीपणाची भावना मनात घर करून राहणं.

कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यास त्रास होणं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं किंवा साध्या गोष्टींतही लक्ष न लागणं.

जगावेसे न वाटणे, मरणाचे विचार मनात येणे हे अतिशय गंभीर लक्षण असून अशावेळी त्वरीत मदतीची गरज असते.