कलिंगडाचे ६ सॅलेड तर तुम्ही उन्हाळ्यात खायलाच हवेत, रेसिपी झटपट आणि खा चविष्ट पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 18:05 IST2025-04-29T17:58:07+5:302025-04-29T18:05:35+5:30

6 watermelon salads you must eat in summer, quick and delicious recipes : नुसते कलिंगड खाऊ नका पाहा किती मस्त सॅलेड करता येते. पौष्टिक व चविष्ट पदार्थ खायलाच हवेत.

उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारची फळे आपण खातो. काही फळे फार लोकप्रिय आहेत, जसे की कलिंगड. कलिंगड लहान मुलांनाही आवडते आणि मोठ्यांनाही. सगळेच आवडीने खातात.

मस्त रसरशीत लाल कलिंगड उन्हाळ्याच्या उष्ण दिवसामध्ये खायला मिळाल्यावर मनाला समाधान व पोटाला थंडावा मिळतो. कलिंगड एकतर आपण नुसते खातो किंवा मग ज्यूस करून पितो. कलिंगडाच्या सालाची भाजीही केली जाते.

कलिंगडाचे कॉम्बिनेशन काही पदार्थांबरोबर फार छान लागते. कलिंगडाची अशी ६ सॅलेड करून पाहा. नक्कीच आवडतील. तसेच पौष्टिकही आहेत. कलिंगडामध्ये दूध घालण्याऐवजी या काही पदार्थांबरोबर कलिंगडाचे मिश्रण करा.

कलिंगड चाट कधी खाल्ले आहे का? कलिंगड, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, भाजलेले दाणे, चाट मसाला असे सगळे पदार्थ मिक्स करा. त्यावर लिंबाचा रस पिळा.

कलिंगड व काकडी दोन्ही पदार्थ थंडावा देणारे आहेत. कलिंगडाचे काप करा, त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी घाला. त्यावर मीठ टाका. लाल तिखट टाका. आणि मिक्स करून मस्त मज्जा घेत खा.

वेस्टर्न पाककलेत फळे व चीज हे कॉम्बिनेशन फेमस आहे. चीज पायनॅपल जसे लोकप्रिय आहे, तसेच कलिंगड व फेटा चीजचे सॅलेडही लोक आवडीने खातात. त्यावर ओरेगॅनो टाका, तसेच मीठ, चाट मसाला टाका.

जसे चीजबरोबर कलिंगडाचे कॉम्बिनेशन केले जाते, तसेच पनीरबरोबरही केले जाते. मोठ्या हॉटेल्समध्ये असे पदार्थ फार महाग विकले जातात.

मोड आलेली कडधान्ये, कलिंगड, काकडी, डाळिंबाचे दाणे व डाळिंबाचा रस घालून वरतून पिस्ता घालायचा. या पदार्थाला मेडीटेरेनियन सॅलेड असे म्हणतात. ते फार पौष्टिक मानले जाते.

फ्रुट सॅलेड तर तुम्ही नक्कीच खाल्ले असेल. आवडीची सगळी फळे मिक्स करा. कलिंगड, केळे, द्राक्ष, सफरचंद अशी सगळी फळे एकत्र करून हे सॅलेड करता येते.