पोट गुबारून गेलं- जड झाल्यासारखं वाटतं? ३ पदार्थ खा, त्रास कमी होऊन पोटाला मिळेल आराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 16:38 IST2025-12-05T16:30:39+5:302025-12-05T16:38:42+5:30

जेवणात काही कमी जास्त झालं की पोट गुबारण्याचा त्रास अनेकांना होतो. पोट जड झाल्यासारखं वाटतं.

हेवी जेवण झाल्यानंतर शारिरीक हालचाली न करता बैठं काम केल्यानेही अनेकांना सतत हा त्रास होतो.

म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा. यामुळे गॅसेस मोकळे होऊन गुबारलेलं किंवा जड पडलेलं पोट हलकं होण्यास मदत होईल.

याविषयीची माहिती डॉ. सलीम जैदी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ते म्हणतात की आल्याचा काढा प्यायल्यानेही गुबारलेलं पोट मोकळं होतं. यासाठी १ कप पाण्यात थोडं आलं किसून घाला. ते पाणी २ ते ३ मिनिटे उकळू द्या. त्यानंतर ते गाळून प्या. त्यात तुम्ही लिंबू किंवा मध घालू शकता.

जिरे, काळंमीठ, मिरेपूड असं घालून ताक प्यायल्यानेही पचनाच्या कित्येक तक्रारी कमी होतात.

जेवल्यानंतर लगेचच बसून राहात असाल तर ती सवय सोडा. काही वेळ नियमितपणे शतपावली करा. यामुळेही पोट जड पडत नाही. अन्नाचं व्यवस्थित पचन होतं.

तुम्ही जेवण झाल्यानंतर पुरेशा प्रमाणात पाणी पित आहात का हे देखील एकदा तपासून पाहा. पाणी कमी पडत असेल तर अपचनाचा त्रास नक्कीच होतो.

















