अँपल सायडर व्हिनेगरचे ५ फायदे, वजन तर कमी होईलच त्याच बरोबर इतरही सुधारणा होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 20:00 IST2025-02-24T19:50:07+5:302025-02-24T20:00:57+5:30
5 benefits of apple cider vinegar : अँपल सायडर व्हिनेगर शरीरासाठी आहे फायदेशीर जाणून घ्या फायदे.

आपल्या घरांमध्ये वर्षानुवर्षे अँपल सायडर व्हिनेगरचा वापर केला जात आहे. वजन कमी करण्यासाठी ते प्यायले जाते.
आता विविध कंपन्यांचे अँपल सायडर व्हिनेगर बाजारात विकत मिळतात.
काही अभ्यासांमधून हे सिद्ध झाले आहे की, अँपल सायडर व्हिनेगर शरीरासाठी उपयुक्त ठरू शकते.
काही अभ्यासकांना असे आढळून आले की, ८ ते १२ आठवडे रोज अँपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
आपण विविध जाहिरांतीमध्ये वजन कमी करण्यासाठी अँपल सायडर व्हिनेगरचा वापर केला जातो हे पाहतोच. वजन कमी करण्यासाठी ते मदत करते.
कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी अँपल सायडर व्हिनेगरचा उपयोग होतो.
तज्ज्ञ सांगतात की, अँपल सायडर व्हिनेगरमुळे रोगजनक विषाणू पसरत नाहीत. तसेच बुरशी लागत नाही.
त्वचेसाठीही अँपल सायडर व्हिनेगर चांगले असते. अनेक उत्पादकांमध्ये त्याचा वापर केला जातो.