शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Summer Care: भरपूर पाणी पिता; पण तरीही डिहायड्रेशन होतंय, शरीरातली उष्णता वाढतेय सांगणारी ४ लक्षणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 12:54 IST

1 / 7
उन्हाळ्यात खूप लोकांना डिहायड्रेशनचा, उष्णतेचा त्रास होतो. सध्या ऊनच एवढं वाढलेलं आहे की पुरेसं पाणी पिऊनही हा त्रास होतोच. पण तरीही कित्येकांना त्याची नेमकी लक्षणं माहिती नसतात त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होत आहे, हे लक्षातच येत नाही.
2 / 7
म्हणूनच पुढे सांगितलेली लक्षणं पाहा. ज्यामुळे तुम्हाला होत असणारा त्रास डिहायड्रेशनमुळेच होत आहे हे लक्षात येईल आणि त्यावर वेळीच उपाय करता येईल.
3 / 7
पहिलं लक्षण म्हणजे वारंवार तहान लागणं. सारखी तहान लागणं म्हणजे शरीरातली उष्णता वाढण्याचं एक लक्षण असतं.
4 / 7
जर तुमचं डोकं सतत दुखत असेल किंवा सारखा थकवा जाणवत असेल तर ते ही डिहायड्रेशनचं एक लक्षण असतं.
5 / 7
लघवीचा रंग एकदा व्यवस्थित पाहा. लघवी जर गडद पिवळ्या रंगाची असेल तर तुम्हाला डिहायड्रेशनचा खूप जास्त त्रास होत आहे.
6 / 7
शरीरातली उष्णता वाढली की अनेक जणांचे ओठ फाटतात. तळहाताची सालं निघतात आणि तळपायांनाही खूप भेगा पडतात.
7 / 7
डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी साधी पाणी तर प्या, पण त्यासोबतच मीठ आणि साखर असणारं लिंबू पाणी, कैरीचं पन्हं, मीठ आणि साखर घातलेलं ताकदेखील भरपूर प्रमाणात प्या.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealthआरोग्यWaterपाणीHealth Tipsहेल्थ टिप्स