Valentines Day: सिंगल आहात? काळजी नको! असा साजरा करा व्हॅलेंटाइन डे, पार्टनरची गरजही भासणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:29 PM2023-02-06T16:29:34+5:302023-02-06T17:01:07+5:30

Valentines Day: फेब्रुवारी महिना येताच सर्वांना ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध लागतात. विवाहित असो वा रिलेशनशिपमधील असो, सर्वजन व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करतात. मात्र या काळात सिंगल असलेल्यांनी काय करायचं हा प्रश्न पडतो.

फेब्रुवारी महिना येताच सर्वांना ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध लागतात. विवाहित असो वा रिलेशनशिपमधील असो, सर्वजन व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करतात. मात्र या काळात सिंगल असलेल्यांनी काय करायचं हा प्रश्न पडतो.

जर तुम्ही सिंगल असाल आणि व्हॅलेंटाइन डे चा आनंद साजरा करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोलो ट्रिपवर जाऊ शकता. अशा परिस्थिती तुम्ही व्हॅलेंटाइन वीकदरम्यान ट्रिपला सुरुवात करू शकता.

सेल्फ लव्हसाठी चांगला मार्ग आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जा आणि आपल्या आवडीचं भोजन घ्या.

जर तुमच्यासोबतचे आणखी काही मित्र सिंगल असतील, तर तुम्ही त्यांच्यासोबत मिळून हाऊस पार्टी करू शकता. असे केल्याने तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही.

स्वत: सोबत दिवस घालवण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी एकट्याने चित्रपट पाहण्यासाठी जाऊ शकता. असं केल्याने तुम्हाला थोडं बरं वाटेल.

कुटुंबासोबत फिरायला जा, जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्या. असं केल्याने तुम्हाला बरं वाटेल.