पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:46 PM2024-05-14T12:46:15+5:302024-05-14T12:49:31+5:30

Narendra modi varanasi lok sabha election 2024 nomination : पीएम मोदींच्या नामांकनावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मागे बसलेले दिसले. तसेच गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, एनडीएचे 12 मुख्यमंत्रीही मोदींचा उमेदवारी भरण्यासाठी आले होते. 

Narendra modi varanasi lok sabha election 2024 nomination PM Modi filed his candidacy for the third time from Varanasi, Shah-Rajnath along with these veterans were present | पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित

पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते 2014 पासून सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. पीएम मोदींच्या नामांकनावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मागे बसलेले दिसले. तसेच गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, एनडीएचे 12 मुख्यमंत्रीही मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. 

PM मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी, माता गंगेचे पूजन केले आणि काल भैरव यांचे दर्शन घेतले -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी, माता गंगेचे पूजन केले आणि काल भैरव यांचे दर्शन घेतले. मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करतान्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, एकनाथ शिंदे, चंद्राबाबू नायडू, संजय निषाद, ओम प्रकाश राजभर, आसामचे नेते प्रमोद बोरा, हरदीप सिंग पुरी आदी नेते पोहोचले होते.



आईच्या आठवणीने भावूक झाले होते PM मोदी -
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईच्या आठवणीने भावूक झाले होते. त्यांच्या आई हिराबेन मोदी यांचे 30 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले आहे. आईच्या  निधनानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच निवडणूक आहे. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, मी येथे आलो नाही, मला येथे आणले गेले आहे. माता गंगेने मला बोलावले आहे. आता मोदी म्हणाले, माता गंगेने मला दत्तक घेतले आहे. यापूर्वी, मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करत असत.
 

 

Web Title: Narendra modi varanasi lok sabha election 2024 nomination PM Modi filed his candidacy for the third time from Varanasi, Shah-Rajnath along with these veterans were present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.