Relationship: महिलांना आवडत नाहीत पुरुषांच्या या ५ सवयी, न सोडल्यास लवकर येतो नात्यात दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 02:05 PM2023-02-09T14:05:52+5:302023-02-09T14:29:46+5:30

Relationship: महिला आणि पुरुषांचं नातं एका नाजूक धाग्यानं बांधलेलं असत. मग तुम्ही पती-पत्नी असा की लिव्ह इन पार्टनर असा, त्यामुळे फरक पडत नाही. विश्वास नसला तर नातं टिकणं कठीण असतं.

महिला आणि पुरुषांचं नातं एका नाजूक धाग्यानं बांधलेलं असत. मग तुम्ही पती-पत्नी असा की लिव्ह इन पार्टनर असा, त्यामुळे फरक पडत नाही. विश्वास नसला तर नातं टिकणं कठीण असतं.

दरम्यान, पुरुषांमध्ये काही अशा वाईट सवयी असतात, ज्या महिलांच्या सहनशीलतेच्या बाहेर असतात. त्यानंतर ब्रेकअप हा एकच मार्ग उरतो. जर तुम्हालाही अशा ५ सवयी असतील तर आजच या सवयी बदला. अन्यथा तुमचंही फिमेल पार्टनरसोबतचं नातं तुटू शकतं.

अनेक पुरुष त्यांच्या फिमेल पार्टनरसोबत दरडावून बोलतात. तर काही जण थोडा जास्तच अधिकार आणि धाक दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र जे पुरुष सन्मान देतात, अशांनाच मुली पसंत करतात.अपमान करणारे मेल पार्टनर महिलांना अजिबात आवडत नाहीत.

बहुतांश पुरुषांना स्वच्छता आवडते. मात्र स्वत:ला स्वच्छ ठेवण्याची काळजी ते घेत नाहीत. त्याउलट बहुतांश मुलींना अस्वच्छता अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांचे पार्टनरसोबत भांडणही होतं. त्याची परिणती अखेरीस नातं तुटण्यामध्ये होऊ शकते.

काही तरुण असे असतात जे रिलेशनशिपमध्ये असूनही इतर मुलींशी फ्लर्ट करणे सोडत नाहीत. अशा परिस्थितीत आपला पार्टनर नात्याबाबत फारसा गंभीर नाही, त्यामुळे त्याला सोडणंच योग्य ठरेल, असे महिलांना वाटू शकते. पुरुषांची ही सवय महिलांना असुरक्षित बनवते.

काही तरुण स्वत:च्या आवडीनिवडींबाबत खूप चोखंदळ असतात. मात्र त्यांच्या फिमेल पार्टनरला काय आवडते, काय आवडत नाही याचा विचार ते करत नाहीत. पुरुषांचं हेच सेल्फ ऑब्सेशन नातं तुटण्याचं कारण ठरू शकतं.

जर पुरुष वारंवार खोटं बोलत असतील आणि खोटं बोलण्यात पटाईत असतील तर ते स्वत:च स्वत:च्या नात्याची खबर खोदत असतात. अशा परिस्थितीत फिमेल पार्टनरचा विश्वास तुम्ही तोडत असाल तर तिला संशयाच्या नजरेने पाहण्यास भाग पाडत असता. या नात्यामध्ये पारदर्शकता ठेवा आणि एकमेकांपासून काहीही लपवू नका.