रोमॅंटिक नात्याच्या सुरूवातीलाच कराल या चुका तर टिकणार नाही नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 10:06 AM2023-10-05T10:06:28+5:302023-10-05T10:19:52+5:30

Dating Mistakes : आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगत आहोत ज्या रिलेशनशिपमध्ये असतान तुम्ही करू नये. जेणेकरून तुम्हाला तुमचं नातं चांगलं आणि टिकवून ठेवण्यास मदत होईल.

रिलेशनशिप म्हटलं की, सगळ्यांनाच आपल्या पार्टनरकडून भरपूर अपेक्षा असतात. पण अनेकदा काही रिलेशनशिप्स एकमेकांकडून फार जास्त किंवा चुकीच्या अपेक्षा ठेवल्यामुळेच टिकत नाहीत. रोमॅंटिक रिलेशनशिपच्या सुरूवातीलाच काही कपल्स अशा काही चुका करतात की, नंतर त्यांना ते महागात पडतं. अशात आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगत आहोत ज्या रिलेशनशिपमध्ये असतान तुम्ही करू नये. जेणेकरून तुम्हाला तुमचं नातं चांगलं आणि टिकवून ठेवण्यास मदत होईल.

मनातलं ओळखण्याची अपेक्षा - प्रत्येकवेळी तुमच्या मनात काय सुरू आहे किंवा तुम्ही काय विचार करताय हे पार्टनरने स्वत:हून ओळखावं ही खरंतर चुकीचीच अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही काही वर्षे जरी सोबत घालवले असतील तरीही याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला वाढदिवसाला काय गिफ्ट हवंय किंवा त्या दिवशी तुम्हाला काहीतरी स्पेशल करायचं आहे हे त्याला आपोआप कळेल. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरने तुमच्यासाठी काही वेगळं करावं किंवा काही वेगळं घ्यावं असं वाटत असेल तर त्याला थेट सांगा.

नेहमी परफेक्ट दिसावं - तुम्हाला जर असं वाटत असेल की, तुमच्या पार्टनरने प्रत्येकवेळी परफेक्ट दिसावं तर तुम्ही चुकताय. कुणी कसं रहावं, कुणी कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मग तो-ती तुमचा पार्टनर का असेना. जसे तुम्ही आहात तसाच जर दोघांनाही आनंद मिळत असेल तर कशाला बनावटीवर इतकं लक्ष केंद्रीत करायचं.

खोटं सांगू नका - नेहमी कपल्स आपल्याबाबत बोलताना काही खोट्या गोष्टी सांगतात. कारण त्यांना समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेशन जमवायचं असतं. पण हे खोटं त्यांना चांगलंच महागात पडू शकतं. अशात आपल्या भूतकाळाबाबत पाटर्नरसोबत स्पष्टपणे सांगायला हवं. खासकरुन तुमच्या आधीच्या नात्याबाबत स्पष्टपणे सांगा जेणेकरुन नंतर ते उघड झाल्यावर महागात पडू नये. पण हे सांगण्याआधी पार्टनरचा स्वभाव जाणून घ्या. जर समोरची व्यक्ती समजून घेणारी नसेल किंवा संशय घेणारी असेल तर काही सांगताना काळजी घ्यावी.

वाढीव गोष्टी - जसे आधी सांगितले की, कपल्स पहिल्या भेटीत एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी आपल्याबाबत अनेक गोष्टी वाढवून किंवा खोट्या सांगतात. पण ते हे विसरतात की, समोरच्या व्यक्तीला पुढे जाऊन सत्य काय आहे हे कळणारच आहे. त्यावेळी तुमच्यावरील त्या व्यक्तीचा विश्वास तुटू शकतो.

जास्त मोकळेपणा - पहिल्या काही भेटींमध्ये अनेकजण फार जास्त मोकळेपणा दाखवतात. त्यामुळे तसं न करता पहिल्या भेटीत एकमेकांची पसंत-नापसंत याबाबत बोला. पहिल्या भेटीतच मुलीच्या फार जास्त जवळ जाण्याच प्रयत्न करु नका. त्याऐवजी मुलीच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच मुलीचं कौतुक करणे विसरु नका. तसेच हे करताना मुलीसमोर जास्त स्टाइम मारु नका. याने तुमची नकारात्मक प्रतिमा तिच्या मनात तयार होऊ शकते.

बोलण्याकडे दुर्लक्ष - अनेकदा भीतीमुळे किंवा स्वभावामुळे काही लोक हे आपल्या पार्टनरच्या बोलण्याकडे लक्ष न देता इकडे तिकडे बघतात. याने तुमचं चुकीचं इम्प्रेशन पडतं. त्यामुळे जेव्हाही पार्टनर काही बोलत असेल किंवा महत्त्वाचं सांगत असेल तर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं.

शारीरिक संबंध - रिलेशनशिपच्या सुरूवातीलाच शारीरिक संबंध ठेवणं फार चुकीचं आहे. किंवा तुम्ही रिलेशनशिपकडे फक्त शारीरिक संबंधाच्या दृष्टीनेच बघत असाल तर हे नातं फार काळ टिकणार नाही. अशात दोघांनाही या गोष्टींसाठी वेळ घ्या.