शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या ५ गोष्टी पार्टनरसाठी कधीच करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 1:06 PM

1 / 5
जर एखाद्या नात्यामध्ये आपल्याला स्वत:चं अस्तित्व विसरावं लागत असेल किंवा बदलावं लागत असेल तर त्या नात्यात राहणं फायद्याचं नसतं. कारण व्यक्ती जशी आहे तसं स्विकारणं हे प्रत्येक नात्याचा मोठेपणा असतो.
2 / 5
तुझा तो मित्र खराब आहे किंवा ती मैत्रिण वाईट आहे असे सांगणारेही बरेच असतात. मात्र त्यांच्या सांगण्यावरून आपल्या मित्र-मैत्रिणींपासून दूर होऊ नये. कारण आपल्या प्रियकर/प्रेयसीच्या आधीपासून हे मित्र आपल्याजवळ असतात आणि आपल्या गुण-दोषांसहीत आपल्यावर प्रेम करत असतात.
3 / 5
तुमच्या स्वप्नांना तुमच्या पार्टनर त्याची स्वप्न मानली पाहिजेत. त्याच्या करिअर व्यवस्थित करून तो तुमच्या स्वप्नांना विसरायला लावत असेल तर ते चुकीचे आहे. पार्टनरसाठी आपली स्वप्न किंवा आपल्या करिअरच्या इच्छा दाबून ठेऊन मन मारून जगु नका.
4 / 5
तुमची इच्छा आणि तयारी आहे की नाही हे न विचारता सेक्ससाठी जबरदस्ती करणारा कधीच उत्तम पार्टनर होऊ शकत नाही. तसंच तुमची इच्छा असताना तेसुध्दा समजून न घेणारा पार्टनर चांगला नाही. फक्त त्यांची इच्छा आहे मात्र तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर सेक्स करू नका
5 / 5
आपली ड्रेसिंग स्टाईल, हेअरस्टाईल किंवा मेकअप स्टाईल आपली ओळख असते. ते बदलणे हे अयशस्वी नात्याचं लक्षण असतं. तुम्हाला आवडतात तसे कपडे घाला मग ते भडक रंगाचे असोत किंवा श़ॉर्ट. फक्त तुमच्या पार्टनरला आवडत नाहीत म्हणून आपली ओळख बदलणे चुकीचे आहे.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपMumbaiमुंबईInternationalआंतरराष्ट्रीय